Sanjay Raut Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sanjay Raut News; ‘ती’ शरद पवारांची राजकीय खेळी?

पहाटेचा शपथविधी हा राष्ट्रपती राजवट उठविण्यासाठी खेळलेला राजकीय डाव असु शकतो, असे खासदार संजय राऊत यांनी सांगितले.

Sampat Devgire

सिन्नर : राज्यातील (Maharashtra) पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा राज्यातील भाजप (BJP) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) पहाटेच्या शपथविधीची चर्चा सुरु आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी विधाने केली आहे. यामध्ये शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही उडी घेतली आहे. ‘ती’ शरद पवारांची राजकीय खेळी असावी, असे राऊत यांनी म्हटले आहे. (Sanjay Raut said it may political game of Sharad Pawar)

शिवसेना नेते संजय राऊत बुधवारी सिन्नर येथे एका खाजगी कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. त्यांनी राज्यातील गाजलेल्या पहाटेच्या शपथविधीची पुन्हा चर्चा सुरु झाल्याचा उल्लेख केला.

खासदार राऊत म्हणाले, पहाटेच्या शपथविधीबाबत देवेंद्र फडणवीस यांनी केलेला शरद पवार यांच्या बाबतीतला गौप्यस्फोट ही खुद्द शरद पवार यांचीच त्या वेळची राजकीय खेळी असावी, असे मत खासदार राऊत यांनी व्यक्त केले.‘

तत्कालीन परिस्थितीत महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट मागे घेणे हे आव्हानात्मक होते. कदाचित महाविकास आघाडीकडून सत्तास्थापनेसाठी राज्यपालांकडे शिफारस करताना बहुमताची यादी दिली गेली असती, तर राजकीय कल्लोळात राज्यपालांनी सत्ता स्थापनेचे निमंत्रण वर्षभर लांबवले असते. त्यामुळेच राजकीय खेळीचा भाग म्हणून दस्तूरखुद्द शरद पवार यांनी फडणवीस यांच्याशी हातमिळवणी करून सरकार स्थापनेचा घाट घातला असेल, तर त्याबाबत मी माझे मत देणार नाही.

पहाटेच्या वेळी घेतलेल्या त्या शपथविधीमुळे महाविकास आघाडीचा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापनेचा मार्ग सोपा झाला. निऱ्हाळे येथे बुवाजी बाबा देवस्थानच्या कार्यक्रमात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना खासदार राऊत यांनी हा खुलासा केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT