Baba Ramdeo News  Sarkarnama news
उत्तर महाराष्ट्र

Baba Ramdeo News : तर देशात इसाई, मुस्लिम धर्म राहिला नसता; योगगुरू बाबा रामदेव

Baba Ramdeo News : हिंदू धर्मात भेदभाव असल्याचे सांगितले जाते ते चुकीचे आहे. धर्मात कोणताही भेदभाव नाही सर्व जण एकोप्याने राहत असतात.

सरकारनामा ब्युरो

Ramdeo Baba News : हिंदू धर्मात भेदभाव असल्याचे सांगितले जाते ते चुकीचे आहे. धर्मात कोणताही भेदभाव नाही सर्व जण एकोप्याने राहत असतात.तसेच हिंदु धर्म हो कोणताही भेदभाव करीत नाही, जर आम्ही भेदभाव केला असता तर तर देशात ख्रिचन आणि मुस्लीम धर्म राहिला नसता.असेखळबळजनक विधान योगगुरू बाबा रामदेव यांनी केले . जामनेर तालुक्यातील गोद्री येथे आयोजित धर्मकुंभ मेळ्यात समारोप प्रसंगी ते बोलत होते.

बाबा रामदेव म्हणाले की, या देशात जगण्याचे एक तर देश चालविण्यासाठी दुसरे संविधान आहे. सनातन धर्माचे संविधान हे आम्हाला जीवन जगण्याची शिकवण देतो. तर देशाच्या संविधानावर आपला देश चालतो. पण हिंदू धर्म हा विश्‍वधर्म, सनातन धर्म आहे. त्याच्या इतकी ताकद दुसऱ्या कोणत्याही धर्मात नाही. सनातन धर्मात जीवन शास्त्र व शिक्षा शास्त्र आहे.,

पण ख्रिश्चन आणि मुस्लीम धर्म हे क्रूरतेचा पुरस्कार करतात, त्याच्यावरच ते आधारलेले आहेत, असे धक्कादायक विधानही बाबा रामदेव यांनी केलं आहे. इतकेच नव्हे तर, या क्रूरतेनेच त्यांनी अनेक लोकांचे मुस्लीम धर्मात धर्मांतर केले. धर्माची भिती दाखवून त्यांनी धर्मातंर केले. पण हिंदू धर्म असा भेदभाव करत नाही. जर भेदभाव केला असता आणि हातात शस्त्र घेतले असते तर आज देशात ख्रिश्चन आणि मुस्लीम धर्म राहिला नसता.

भारतातील एकाही व्यक्तीने आपल्या इच्छेने मुस्लिम धर्म स्वीकारला नाही. त्यांचे जबरदस्तीने धर्मांतर करण्यात आले. पण आता त्यांना पुन्हा आपल्या धर्मात घेण्याची गरज आहे. एकमेकांमधील सर्व भेदभाव विसरून संपुर्ण हिंदू समाजाने एकजूट होण्याची गरज आहे. एकमेकांच्या संकटात मदतीसाठी उभे राहणे हाच आपला धर्म असल्याचंही यावेळी बाबा रामदेव यांनी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT