Gulabrao Patil Replied to Raosaheb Danve, Gulabrao Patil Latest News, Raosaheb Danve Latest News
Gulabrao Patil Replied to Raosaheb Danve, Gulabrao Patil Latest News, Raosaheb Danve Latest News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

'तेव्हा भाजपचं कुणासोबत लफडं होतं?'; गुलाबराव पाटलांचा दानवेंना सवाल

सरकारनामा ब्यूरो

Gulabrao Patil Replied to Raosaheb Danve

जळगाव : 'रावसाहेब दानवेंना बोलण्याचा अधिकार नाही. जळगाव ग्रामीण मतदारसंघांमध्ये मी उभा होतो, तेव्हा भाजपाचा (BJP) बंडखोर उमेदवार उभा होता. तेव्हा तुमच्या भाजपावाल्यांनी कुणाशी लफडं केलं होतं? याचं आधी उत्तर द्या,'' असा सवाल करत मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी रावसाहेब दानवेंच्या (Raosaheb Danve) टिकेवर प्रतिक्रिया दिली आहे.

शिवसेनेचं आणि आमचं लग्न जमलं पण शिवसेनेने दुसऱ्यासोबत पळून जाऊन लग्न केलं. अशी टीकाकेंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जालन्यात एका कार्यक्रमात बोलताना केली होती, त्याला गुलाबराव पाटील यांनी उत्तर दिले आहे. याच वेळी त्यांनी खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या आव्हानांचाही समाचार घेतला आहे.खासदार नवनीत राणा यांनी त्यांच्याविरोधात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवडणूक लढवण्याचे आव्हान दिले आहे.

उद्धव ठाकरे यांनी लोकांना मुख्यमंत्री केले, आमच्यासारख्या लोकांना मंत्री केले. त्यांना निवडणुकीला उभे राहण्याची गरज नाही. राणा दाम्पत्यास निवडणुकीला उभे राहण्याची गरज आहे. ते निवडणुकीला उभे राहताना कोणत्या पक्षातून आले तेव्हा त्यांना मायबाप माहीत नव्हता त्या पक्षाचा, त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करू नये. असा सणसणीत टोलाही गुलाबराव पाटील यांनी लगावला.

राणा दाम्पत्याला माध्यमांशी बोलण्याची परवानगी नसताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यांनी सुरुवातीपासूनच न्यायालयाच्या आणि पोलीस प्रशासनाच्या शांततेच्या आदेशाचा भंग केला आहे. त्यामुळे आता अजून काही गोष्टी अपूर्ण राहिल्या असतील, तर ते न्यायालय बघून घेईल. मुख्यमंत्री आणि ठाकरे कुटुंबावर टीका करून त्यांना फक्त प्रसिद्धी मिळवायची आहे. ज्या प्रमाणे राज ठाकरेंनी भोगा काढला आणि भोंगा बंद पडला, तसा हिचा ही भोंगा बंद पडेल. ”

राज ठाकरेंच्या आयोध्या दौऱ्यावर विचारले असता गुलाबराव पाटील म्हणाले, “जिथे बाळासाहेबांनी आपले शिवसैनिक पाठवले, जिथे शिवसैनिकांनी कारसेवा केली,जिथे शिवसैनिकांची पावलं पडली त्याच्यावर राज ठाकरेंनी नतमस्तक व्हावे हीच अपेक्षा आहे.” असंही पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT