CM Eknath Shinde
CM Eknath Shinde Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांनी बैठक रद्द केल्याने शिंदे गटाचे कार्यकर्ते सतर्क!

Sampat Devgire

नाशिक : महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi government) सरकारला दणका देत राज्यात स्थापन झालेल्या strनाशिकच्या (Nashik) प्रश्नांसंदर्भात फक्त बैठका आणि चर्चा एवढेच सुरू आहे. ठोस असे नियोजन होत नसल्याने नाशिककरांना फक्त ‘मॅजिक शो’ वर समाधान मानावे लागते का, असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांकडे शुक्रवारी बोलविण्यात आलेली बैठक रद्द झाल्याने शिंदे गटाच्या एका पदाधिकाऱ्याची घाई चांगलीच अंगलट आली आहे. (Shinde group`s strategy disturb after cencelation of Cm meeting)

दरम्यान एकनाथ शिंदे गटाच्या बैठकांत सहकारी भाजप घुसखोरी करीत असल्याचे चित्र आहे. यात दोन्ही गट बैठकावंर बैठका घेत असला तरी प्रत्यक्ष कार्यवाही मात्र होताना दिसत नसल्याची तक्रार आहे.

राज्यात भाजप व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे सरकार स्थापन झाल्यापासून एकीकडे उद्धव ठाकरे शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दुफळी निर्माण करण्याचे प्रयत्न होत असताना दुसरीकडे लोकाभिमुख सरकार अशी प्रतिमा निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहे. राज्यातील मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे, औरंगाबाद, नागपूर या अधिक लोकसंख्येच्या शहरांकडे लक्ष केंद्रित करताना येथील समस्या सोडविण्याचे विद्यमान राज्य सरकारचे प्रयत्न आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी नाशिक महत्त्वाचे आहे. यापूर्वी शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून नाशिकची ओळख आहे. त्या पार्श्वभूमीवर येथे सत्तेच्या राजकारणात स्थान बळकट करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पालकमंत्र्यांच्या मार्फत बैठकांचा धडाका सुरू आहे. बैठका होत असल्या तरी मात्र यातून इनपुट बाहेर पडत नसल्याने फक्त बैठका चर्चा एवढ्यावरच नाशिककरांना समाधान मानावे लागत असल्याची भावना निर्माण झाली आहे.

फक्त चर्चांचा फार्स

नाशिकच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात पालकमंत्री दादा भुसे यांनी महापालिका मुख्यालयात बैठक घेतल्यानंतर शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रालयातील दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आगामी कुंभमेळ्यासह शहरातील महत्त्वाच्या प्रकल्पात संदर्भात या बैठकीत चर्चा केली जाणार होती. परंतु, मुख्यमंत्र्यांनी सदर बैठक रद्द केल्याने फक्त चर्चांचा फार्स असल्याची भावना निर्माण झाली आहे.

भाजप- शिंदे गटात श्रेयवाद

शिंदे गटाच्या पालकमंत्र्यांच्या बैठकांवर बैठका होत असताना सदर बाब भाजप आमदारांना खटकत आहे. शिंदे गटाचे राजकीय वजन वाढल्यास राजकीय दृष्ट्या परवडणारे नाही. त्यामुळे पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडून शहरातील प्रश्नांसंदर्भात बैठकांवर बैठका सुरू असताना भाजपच्या आमदारांनीदेखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बैठकांचे नियोजन केले. त्यामुळे प्रश्न सोडविण्याचे श्रेय शिंदे गटाला मिळू नये म्हणून एका पदाधिकाऱ्याच्या आग्रहाखातर मुख्यमंत्र्यांकडे बैठक लावण्यात आली होती, मात्र ऐनवेळी बैठक रद्द करण्यात आली.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT