Eknath Shinde Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

`सारथी`च्या माध्यमातून नोकऱ्या देणारे तयार व्हावेत!

एकनाथ शिंदे यांनी `सारथी` संस्थेच्या विभागीय कार्यालयाचे उद्‌घाटन

Sampat Devgire

नाशिक : राज्यातील (Maharashtra) सर्वांगीण जनतेचा विकास (Comprehensive Devolopment) व्हायला हवा. शिक्षण कृषी आरोग्य हे महत्त्वाचे घटक आहेत. विद्यार्थ्यांना (Students) न्याय देण्याची संधी सारथी (SAARTHI) संस्थेच्या निमित्ताने निर्माण झाली आहे. सरकार जनतेच्या मनातील काम करणारे आहे. सारथीला सक्षमीकरणाची आवश्यकता असून नोकऱ्या देणारे घटक तयार व्हायला पाहिजे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (Chief Minister) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज येथे केले. (Chief minister assures support for saarthi institute)

सारथी संस्थेच्या उत्तर महाराष्ट्र कार्यालयाचे शुक्रवारी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. यावेळी त्यांनी राज्य शासनाच्या विविझ धोरणांविषयी माहिती दिली.

यावेळी छत्रपती संभाजी राजे यांनी सांगितले की, माझी नेहमी सहकाराची भूमिका असते. सर्व योजना गरीब ग्रामीण भागात पोहोचवायला हव्यात. यासाठी प्लास्टर प्लॅन तयार करायला हवा.

मराठा कुणबी, कुणबी मराठा कुटुंब सध्या दुर्लक्षित आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळवायचे असेल तर सामाजिक मागासले पण सिद्ध व्हायला हवे, म्हणून मराठा समाजाचे पुन्हा एकदा सर्वेक्षण झाले पाहिजे, असे मत छत्रपती संभाजी राजे यांनी व्यक्त केले.

यावेळी हेमंत गोडसे यांनी सांगितले की, या संस्थेचे नाशिक विभागीय कार्यालयाच्या माध्यमातून युवक युवतींना मोठ्या प्रमाणावर रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. सारथी संस्थेत शंभर कर्मचारी काम करीत असून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन योजनांबरोबरच दोन वर्षात ३४ मुले यूपीएससीमध्ये निवडून गेले आहेत. शिवाय नाशिक विभागाला दीड एकर जागा देण्यात आली आहे. त्यामुळे युवकांच्या व युवतींच्या सर्वांगीण विकासासाठी ही संस्था काम करणार असल्याचे सारथी संस्थेचे प्रभारी अध्यक्ष मधुकर कोकाटे यांनी सांगितले.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज संभाजी राजे छत्रपती, पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार किशोर दराडे, आमदार राहुल ढिकले, आमदार सीमा हिरे, देवयानी फरांदे, दिलीप बनकर, जिल्हाधिकारी गंगाधरन डी., सारथी संस्थेचे उपव्यवस्थापकीय संचालक नितीन गावंडे, व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे, प्रभारी अध्यक्ष मधुकर कोकाटे, नाशिकचे विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रादेशिक मुख्य अभियंता पी. बी. भोसले उपस्थित होते.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT