Congress District president Pradeep Pawar.

 

Sarkarnama

उत्तर महाराष्ट्र

भविष्यात काँग्रेसला नक्कीच चांगले दिवस!

चोपडा येथे काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी दावा केला.

Sampat Devgire

चोपडा : काँग्रेस हा तळागाळातील जनसामान्यांचा पक्ष आहे. पक्ष वाढीला कुठलीही अडचण नाही. भविष्यात काँग्रेसला (Congress) चांगले दिवस येणार असून, प्रत्येकाने पक्ष संघटन केल्यास पक्षवाढीला कुठलीही अडचण येणार नाही. असे प्रतिपादन पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार (Pradeep Pawar) यांनी येथे केले.

येथील कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील स्मार्ट हॉलमध्ये कॉंग्रेसचा कार्यकर्ता मेळावा नुकताच उत्साहात झाला. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, सध्या जनतेच्या प्रश्नांवर देशातीक सरकार उदासीन आहे. त्यांना केवळ आपला राजकीय अजेंडा राबविण्यातच रस आहे. त्यासाठी ते सातत्याने विविध माध्यमांचा वापर करून संभ्रम निर्माण करण्यात व्यस्त झाले आहेत.

काँग्रेसचे केंद्रात सरकार असताना अर्थव्यवस्था, सामान्यांचे प्रश्न, रोजगार, उद्योग-व्यावसायाला चालना यावर सरकारचा भर होता. जगभरात कच्च्या तेलाचे दर वाढत असताना पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पेट्रोलचे दर साठ रुपयांवर नियंत्रीत केले होते. तेव्हा भाजपकडून महागाईचा आगडोंब उसळला असी टीका होत होती. आज जगभरात कच्च्या तेलाच्या किमती खाली येत आहेत. मात्र भारतात पेट्रोल, डिझेलच्या किमती भरमसाठ वाढत आहेत. सामान्य माणसाच्या खीशातून पैसे काढून घेऊन त्याला गरीब व असहाय्य केले जात आहे. हे लोकांच्या लक्षात अस्लायेन भविष्यात नक्कीच काँग्रेसला चांगले दिवस येणार आहे. त्यासाठी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी जनतेशी संपर्क वाढवून त्यांच्यात हा संदेश पोहोचवावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष व माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, माजी जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील, जिल्हा बँकेच्या संचालिका शैलजा निकम, माजी संचालक डॉ. सुरेश पाटील, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सुलोचना वाघ, जिल्हा सरचिटणीस जमील शेख, शहराध्यक्ष के. डी. चौधरी, समन्वयक नंदकिशोर सांगोरे, नगरसेविका सुप्रिया सनेर, कॉंग्रेस सेवादलाचे प्रदेश उपाध्यक्ष अजबराव पाटील उपस्थित होते.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT