Shivsena workers at Kachagi Village of Maharashtra
Shivsena workers at Kachagi Village of Maharashtra Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

सुमंत रुईकरांचा संकल्प नाशिकचे `हे` शिवसेना कार्यकर्ते पूर्ण करणार!

Sampat Devgire

नाशिक : नाशिक (Nashik) ते तिरुपती बालाजी पायी यात्रा नाशिकचे शिवसेना (Shivsena) नेते विरेंद्रसिंग उर्फ पप्पू टिळे व मधुकर सांगळे पूर्ण करणार आहेत. त्यामुळे ते पुन्हा चर्चेत आले असुन त्यांच्याया उपक्रमासाठी गावोगावी त्यांचा उस्फूर्त स्वागत केले जात आहे.

शिवसेना पक्षप्रमुख तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दीर्घायुष्य मिळावे तसेच कोरोना विषाणूपासून सर्वांची मुक्तता व्हावी यासाठी बीड येथे शिवसेना कार्यकर्ते (कै.) सुमंत रुईकर याने बीड ते तिरुपती बालजीला पायी जाण्याचा संकल्प केला होता. पण अर्धावरच त्यांचे निधन झाले. त्यामुळे त्यांचा तो संकल्प अर्धवट राहिला. हा संकल्प पुर्ण करण्यासाठी नाशिक ते तिरुपती बालजी पायी यात्रेचा विडा नाशिक येथील शिवसेना मध्य नाशिक संघटक विरेंद्रसिंग उर्फ पप्पू टिळे व मधुकर सांगळे यांनी केला आहे. ते यापूर्वीच नाशिकहून रवाना झाले आहेत.

त्यांच्या या उपक्रमाबाबत त्यांचे ठिकठिकाणी स्वागत होत आहे. अनेक ठिकाणी उत्स्फूर्त स्वागत होत असुन काल ते महाराष्ट्रातील शेवटचे गाव कचगी येथे पोहचले. यावेळी तेथील गावकऱ्यांनी त्याचे स्वागत करून पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT