Shivsena leader Sanjay Raut
Shivsena leader Sanjay Raut Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sanjay Raut News; `त्या` नगरसेवकांसाठी शिवसेनेचे दार कायमचे बंद झाले!

Sampat Devgire

नाशिक : दोन दिवसाच्या दौऱ्यावर आलेले शिवसेनेचे (Shivsena) खासदार व प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) नाशिकची (Nashik) वेस ओलांडून मुंबईकडे प्रयाण करत नाही तोच १३ माजी नगरसेवकांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. (Those who join Shinde group are agents not genuine)

शिंदे गटात सहभागी झालेले माजी नगरसेवक हे दलाल असून, त्यांचे श्राद्ध घालू अशी टीका त्यांनी केली. २०२४ च्या निवडणुकीत हे झुंड व दलाल आमच्या दारात पुन्हा उभे राहतील. शिंदे गटात जे गेले त्यांना जाणीव निष्ठा अजिबात नाही. ज्या दिवशी सरकार पडेल, त्या दिवशी ते बेवफा होऊन परत आमच्या दारात येतील. मात्र, त्यांच्यासाठी आता शिवसेनेचे दरवाजे बंद झाले आहे, अशा शब्दात राऊत यांनी समाचार घेतला.

शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या मुलाच्या विवाहाचे निमित्ताने खासदार राऊत दोन दिवसासाठी नाशिकमध्ये आले. या वेळी राऊत यांच्या मांडीला मांडी लावून प्रवेशकर्ते १२ माजी नगरसेवक व त्यांच्या नेत्यांनी भोजन घेतले. त्यामुळे शिवसेना भक्कम असल्याचा दावा करत राऊत दुसऱ्या दिवशी मुंबईकडे निघाले. मात्र, १६ डिसेंबरला ११ नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला.

यावर बोलताना राऊत म्हणाले, शिवसेना सोडून जे शिंदे गटात गेले ते दलाल आहे. अशा दलालांना कट्टर शिवसैनिक माफ करणार नाही. ज्यांना जायचे होते ते आधीच गेले. यातील तीन लोकांची हकालपट्टी आम्ही यापूर्वीच केली आहे. महाराष्ट्रातून काही लोक गेले, त्यातीलच हे काही दलाल आहेत. जमिनीचे व्यवहार करणारे व कमी कुवत असलेले हे लोक असून त्यांना निष्ठा व श्रद्धा नाही. ज्यांनी पक्ष सोडला त्यांचा मूळचा व्यवसाय दलालीचा आहे. ज्यांची सत्ता असते, त्यांच्याकडे ते लोक जातात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT