Rupali chakankar
Rupali chakankar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Crime : नाशिकमध्ये तीन महिन्यांच्या मुलीला संपवलं; महिला आयोगाला वेगळाच संशय...

सरकारनामा ब्युरो

Nashik Crime news नाशिक शहरातून मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. एका अज्ञात महिलेने घरात घुसून आधी आईला बेशुद्ध करत तीन महिन्याच्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे. नाशिकच्या गंगापूर-सातपूर लिंक रोडवर ही घटना घडली आहे. या घटनेने नाशिकसह संपूर्ण राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या घटनेची राज्य महिला आयोगाने दखल घेतली असून वेगळाच संशय व्यक्त केला आहे.

आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्विट करत नाशिक पोलिसांना या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. ''नाशिक शहरातील गंगापूर रॉड धृवनगर परिसरात तीन महिन्याच्या चिमुकलीची गळा चिरून हत्या करण्यात आली.पोलिसांनी अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तपास अधिकारी व त्यांची यंत्रणा तत्परतेने तपास करत आहेत ,आयोगाकडून तसा सूचना देण्यात आल्या आहेत.पण एकंदर माहिती घेता केवळ मुलगी आहे म्हणून ही हत्या असू शकते,आणि अशी जर नीच मानसिकता असेल तर ही अतिशय दुदैवी घटना आहे. आरोपींचा तपास व योग्य ती कडक कारवाई यासाठी आयोग पाठपुरावा करेल, '' असे ट्विट रुपाली चाकणकर यांनी केलं आहे.

काय आहे प्रकरण ?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,नाशिकच्या गंगापूर-सातपूर लिंक रोडवरील धृवनगर परिसरात भूषण रोकडे आपल्या पत्नी, आई आणि 3 महिन्यांच्या मुलीसोबत राहतात. भूषण रोकडे सोमवारी (२० मार्च) कामाला गेल्यानंतर घरात त्यांच्या आई आणि पत्नी होत्या. संध्याकाळच्या वेळी भूषण यांची आई दूध आणण्यासाठी घराबाहेर पडल्या. त्याचवेळी एक पंजाबी ड्रेस घातलेली अज्ञात महिला अचानक घरात घुसली. त्यांच्या पत्नीला बेशुद्ध करुन त्या महिलेने तीन महिन्यांच्या धृवांशीची गळा चिरुन हत्या केली. या घटनेने नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT