Jalgaon Bank Robbery Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Bank Robbery in Jalgaon : जळगावात थरार ! भरदिवसा बँकेवर दरोडा अन्...

Jalgaon SBI News : दरोडेखोरांनी व्यवस्थापकावर केले कोयत्याने वार

सरकारनामा ब्यूरो

Jalgaon Bank Robbery : जळगावात आज गुरुवारी (ता. १ जून) खळबळजनक घटना घडली आहे. शहरातील स्टेट बँकेच्या शाखेत भरदिवसा सशस्त्र दरोडा टाकण्यात आला आहे. यावेळी काही मिनिटातच १५ ते १७ लाख रुपयांची रोकड लुटली आहे. या घटनेमुळे बँकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

जळगावात (Jalgaon) गुरुवारी भरदिवसा स्टेट बँकेंच्या शाखेवर दरोडा टाकून रोख रक्कम दरोडेखोरानी पळविली आहे. शहरातील कालिका माता मंदिर परिसरातील स्टेट बँकेच्या शाखेत हा दरोडा टाकण्यात आला. दरोडेखोरांनी बँकेतील उपस्थितांना शस्त्राचा धाक दाखविला. त्यानंतर दरोडेखोर सुमारे १५ ते १७ लाखाहून अधिक रुपयांची रोकड घेऊन पसार झाले आहेत. भरदिवसा बँकेवर पडलेल्या या घटनेने शहरासह जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. (Jalgaon Bank Robbery)

जळवात शहरातील कालिका माता मंदिर परिसरात काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालयाजवळ स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. ही बँक गुरुवारी नियमीतपणे उघडली. त्यानंतर सर्व कामकाजास सुरुवात झाली होती. दरम्यान, सकाळी साडेनऊच्या सुमारास दोन युवक दुचाकीवरून बँकेत आले. त्यांच्याकडे कोयत्यासारखे धारदार शस्त्र होते. या शस्त्रांचा त्यांनी व्यवस्थापकासह पाच-सहा कर्मचार्‍यांना धमकावले.

या दरोडेखोरांनी व्यवस्थापकाच्या मांडीवर कोयत्याने वारही केला आहे. यानंतर त्यांनी बँकेतील रोकड घेऊन पळून गेले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी बँकेकडे धाव घेतली. पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अपर अधिक्षक चंद्रकांत गवळी, एमआयडीसीचे प्रभारी शंकर शेळके आदींनी सहकार्‍यांसह बँकेला भेट दिली. या दरोड्याच्या तपासासाठी श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले आहे. भरदिवसा घडलेल्या काही मिनिटांच्या या प्रकारामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Jalgaon Police)

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT