Harshwardhan Sapkal Tipu Sultan Shivaji Maharaj comparison controversy Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

BJP Congress Controversy 2026 : राजकारणात खालची पातळी? ‘जीभ छाटा, 10 लाख देतो’; भाजप शहराध्यक्षांच्या घोषणेनं खळबळ

BJP city president 10 lakh reward for cutting Congress leader tongue: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरोधात भाजप शहराध्यक्षांनी जीभ छाटण्याची घोषणा करत आणखी राजकीय वातावरण तापवलं आहे.

Pradeep Pendhare

Maharashtra Political Clash: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरोधात काय करू, काय नको, असे भाजप कार्यकर्त्यांना झाले आहे. पुण्यात जोरदार राडा झाला. भाजप-काँग्रेसच्या 100 पेक्षा जास्त पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झाला. जालना जिल्ह्यातील भाजप आमदार नारायण कुचे यांनी सपकाळ यांचे तोंड काळे करणाऱ्यांना दोन लाख रुपये जाहीर केले आहे.

अहिल्यानगरमधील भाजपचे शहराध्यक्ष अनिल मोहिते यांनी एक पाऊल पुढे टाकत, थेट जीभ छाटा, 10 लाख देतो, अशी जहरी भाषा वापरली. या मुळे भाजप-काँग्रेसमधील धुरळ्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी टिपू सुलतान अन् छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना केल्याचा आरोप करत, भाजप काँग्रेसविरोधात राज्यात आक्रमक झाली आहे. भाजपकडून काँग्रेसचा, विशेष करून सपकाळ यांचा ठिकठिकाणी निषेध केला जात आहे. अहिल्यानगरमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांनी देखील निषेध केला.

हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिमा रस्त्याला चिटकवून ती पायाखाली तुडवण्यात आली. तसेच भाजपच्या (BJP) पदाधिकाऱ्यांनी जोडे मारून निषेध केला. अशा बेताल वक्तव्य करणाऱ्या हर्षवर्धन सपकाळ यांची जीभ छाटणाऱ्यास शहर भाजपच्यावतीनं 10 लाखांचे बक्षीस दिले जाईल, अशी घोषणा करण्यात आली.

अहिल्यानगर शहरातील जुन्या बस स्थानक चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांनी पुष्पहार अर्पण केला. यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांच्या विधानाचा निषेध करण्यात आला. या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जय जयकारांच्या घोषणा दिल्या. हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

अनिल मोहिते म्हणले, "काँग्रेसचा प्रदेशाध्यक्षकांनी नालायकपणा केला आहे. त्याचा निषेध करतो. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर हिंदूंची कत्तल करणाऱ्या टिपू सुलतानशी तुलना करणं ही लाजिरवाणी गोष्ट आहे. औरंगजेबाच्या समाधीचं उदात्तीकरण करणाऱ्या या काँग्रेसकडून यापेक्षा वेगळी अपेक्षा समाजाला नाही." लव जिहाद।, व्होट जिहाद करणाऱ्या, अतिरेकी प्रवृत्तींना आजपर्यंत या काँग्रेसवाल्यांनी पोसले आहे. त्यामुळे अशा या काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षाने त्वरित राजीनामा द्यावा, अशी मागणी मोहिते यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT