Chhagan Bhujbal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Chhagan Bhujbal; प्रदुषणाच्या बाबतीत मुंबई शहर सर्वात पुढे गेले आहे

पोस्टर, होर्डिंग मुळे होणारे शहराचे विद्रुपीकरण रोखण्याची मागणी छगन भुजबळ यांनी केली.

Sampat Devgire

नाशिक : मुंबई (Mumbai) शहराचे वैभव टिकविण्यासाठी मुंबई स्वच्छ व सुंदर ठेवण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी शहरातील शाळा, रुग्णालय, मंड्या, फुटपाथ हे स्वच्छ ठेवावे. हवा, पाणी आणि ध्वनी प्रदुषणाला आळा घालण्यात यावा. तसेच मुंबईची स्काय लाईन खराब होऊ नये यासाठी अनावश्यक स्काय वॉक काढून टाकण्यात यावे, अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी विरोधी पक्षाने नियम २९३ मांडलेल्या प्रस्तावावर बोलतांना केली. (Chhagan Bhujbal create attention of Assembly on Mumbai city issues)

विरोधी पक्षाने नियम २९३ मांडलेल्या प्रस्तावावर छगन भुजबळ म्हणाले की, मुंबई शहर देशाची आर्थिक राजधानी आहे. आर्थिक गोष्टीत आपण सर्वांच्या पुढेच असतो मात्र प्रदुषणाच्या बाबतीत पण सर्वात पुढे आपण गेलेलो आहोत.मुंबई स्वच्छ सुंदर राहिली तरच तीच वैभव कायम राहील त्यासाठी अधिक प्रयत्न करण्यात यावे.

ते म्हणाले, मुंबईत हवा, पाणी आणि ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हवा प्रदुषित- ठोस उपाययोजना होतांना दिसत नाही. सगळीकडे बांधकामे रात्रं - दिवस सुरु आहे.गाड्यांचे प्रमाण देखील वाढले - लोकांना श्वसनाचे त्रास होतोय. मागच्या वर्षापासुन ही परिस्थीती आहे.

राज्यात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मग मुंबई विभाग नेमकी काय करतंय असा सवाल आहे. हवेच्या गुणवत्तेची पातळी धोक्याचे चिन्ह ओलांडत असतानाही नगण्य कारवाई झाली आहे. कायद्याने कलम ३१ ए अंतर्गत मंडळाला आणखी अधिकार दिले आहेत, ज्यामध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना सहा वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दंड होऊ शकतो. तसंच, दोषी ठरवल्यानंतर प्रत्येक दिवसांसाठी पाच हजारापर्यंतचा दंड होऊ शकतो. हवा प्रदुषित आहे तसेच आवाजाच्या प्रदुषणाचा सुद्धा सोक्ष - मोक्ष लागला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.

ते म्हणाले की, मुंबईत समुद्रातून येणारी हवा ही पुन्हा दुसऱ्या दिशेने समुद्राकडे जाते. त्यामुळे मुंबईतील हवेचे प्रदूषण कमी होते. मात्र आता मुंबईत मोठ मोठ्या इमारती उभ्या राहत असल्याने हवा आडली जात आहे. परिणामी हवेचे प्रदूषण अधिक वाढत आहे. याबाबत देखील उपयोजना करण्याची आवश्यकता आहे. मुंबईत मेट्रोसह अनेक प्रकल्प सुरु आहे.

त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत आहे. अशा परिस्थितीत एका झाडाच्या बदल्यात अनेक झाले आपण लावली पाहिजे. ट्राफिकचा प्रश्न टाळण्यासाठी रस्त्यांची निर्मिती होते. मात्र अतिक्रमण आणि विक्रेते यामुळे अधिक ट्राफिक होते तासंतास गाड्या एका जागेवर उभ्या राहतात. त्यामुळे आशिक प्रदूषण होते याकडे त्यांनी लक्ष वेधले.

ते पुढे म्हणाले की, मुंबईत अनेक ठिकाणी अस्वच्छता आज देखील आढळते, इस्पितळे, मंड्या, शाळा इ. स्वच्छ ठेवल्याच पाहिजे. जुन्या इमारती- इमारती स्वच्छ आणि रंगरंगोटी केलेल्या असाव्या असा मुंबई महानगरपालिकेचा कायदा आहे. या कडे डोळेझाक केली जात आहे. मुंबईत महानगरपालिकेचे अनेक रुग्णालय आहे. ही रुग्णालये सुधारली पाहिजेत. मुंबई फक्त स्वच्छ ठेवली तर ती सुंदर दिसेल. मुंबईत अनेक स्काय वॉक उभारण्यात आले आहे. यामुळे शहराची स्काय लाईन खराब होत आहे. आवश्यक असतील ते ठेवा बाकी वापरात नसतील ते स्काय वॉक काढून टाकण्यात यावेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT