Trimbakeshwar Sadhu Murder News: आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी त्र्यंबकेश्वर येथे जोरात सुरू आहे. शासन प्रशासन आणि साधूंचे आखाडे यांच्यात नियमित संवाद सुरू आहे. त्यातच दोन दिवसांपूर्वी धक्कादायक घटना घडल्याने साधू संतप्त झाले आहेत.
त्र्यंबकेश्वर शहरात दोन दिवसांपूर्वी रात्री मद्यपी टोळीने धुडगूस घातला. अद्यपी टोळीच्या सशस्त्र हल्ल्यात एका साधूला प्राण गमवावा लागला. मृत्यू झालेल्या साधूचे नाव मुळ आधाराकार्ड नुसार असेलेल नाव प्रभाकर सदाशिव धोटे (वय 52) असे आहे. मात्र हे त्याचे मूळ नाव असून साधू म्हणून त्याचे नाव वेगळे आहे. त्याचा शोध घेतला जातो आहे.
ही घटना घडल्यावर पोलिसांनी मात्र अतिशय उदासीन भूमिका बजावण्याचा आरोप होत आहे. साधूचा आकस्मित मृत्यू अशी नोंद करण्यात आली. त्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात संबंधित मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आला.
ही घटना साधूना समजल्यावर त्यांनी याबाबत संताप व्यक्त केला. आखाडा परिषदेचे सचिव महामंडलेश्वर शंकरानंद सरस्वती व अन्य साधूनी याबाबत पोलिसांची भेट घेऊन माहिती घेतली. पोलिसांनी अतिशय उदासीन भूमिका बजावल्याचे स्पष्ट झाले.
ही घटना घडलेल्या ठिकाणी दुकानदाराच्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये त्याचे रेकॉर्डिंग झाले आहे. दोन्ही संबंधित दुकानदाराशी संपर्क करून सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात टोळीने सशस्त्र हल्ला करून साधूचा खून केल्याचे उघड झाले.
संबंधित माहिती आणि सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना देण्यात आले. नंतर पोलिसांनी याबाबत पुढील तपास सुरू केला आहे. या फुटेजच्या आधारे एका संशयताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या खुनाचा लवकरच तपास लागेल आणि गुन्हेगार पकडले जातील असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
या संदर्भात महामंडलेश्वर शंकरानंद सरस्वती यांनी पोलीस आणि शासनाच्या सर्व प्रशासनाने आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जागरूक राहण्याची आवश्यकता आहे असे सांगितले. कुंभमेळा सुखरूप पार पाडण्याची गरज आहे. त्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांवर आहे. त्यामुळे अशा अप्रिय घटना घडल्यास त्यातून अशांतता निर्माण होऊ शकते असा इशारा देण्यात आला.
------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.