Dr. B. G. Shekhar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Transfer of police officers : पोलिस महानिरीक्षक डाॅ. शेखर यांची बदलीविरोधात 'कॅट'मध्ये याचिका...

Home Department : वरिष्ठ अधिकाऱ्याची 'कॅट'कडे धाव. सेवानिवृत्तीस चार महिने असताना तसेच कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच गृह विभागाने केली बदली.

Pradeep Pendhare

Nagar News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सनदी आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. यात गृह विभागाने केलेल्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या चर्चेत राहिल्या. काही अधिकाऱ्यांना बढतीवर बदली, तर काहींना इच्छुक ठिकाणी नियुक्ती मिळाली. ज्यांना इच्छुक ठिकाणी बदली मिळाली नाही ते नाराज झाले आहेत.

आता ही नाराजी उघड होऊ लागली आहे. नाशिक परिक्षेत्राचे तत्कालीन विशेष पोलिस महानिरीक्षक डाॅ. बी. जी. शेखर यांनीही नाराजी व्यक्त करत त्यांनी बदलीविरोधात केंद्रीय प्रशासनिक न्यायाधिकरणात (कॅट) धाव घेतली आहे. सेवानिवृत्तीस चार महिने असताना तसेच कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच गृह विभागाने बदली केल्याचे त्यांनी याचिकेत म्हटले आहे.

डाॅ. शेखर यांनी कॅटमध्ये धाव घेतल्याने त्यांचा हा निर्णय महाराष्ट्र राज्य पोलिस दलात चर्चेत आला आहे. त्यांच्या जागेवर ठाणे शहराचे तत्कालीन सहआयुक्त दत्तात्रय कराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डाॅ. शेखर यांना पुणे येथील मोटार परिवहन विभागात नियुक्ती देण्यात आली आहे. या बदलीविरोधात त्यांनी 'कॅट'मध्ये याचिका दाखल केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

डाॅ. शेखर यांची बदली एप्रिल 2022 मध्ये नाशिक परिक्षेत्रात विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून झाली होती. आता जानेवारी 2024 मध्ये बदली झाली. त्यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेला नाही. तसेच सेवानिवृत्तीला चार महिन्यांचा कालावधी असताना बदली झाल्याचे डाॅ. शेखर यांनी याचिकेत म्हटले आहे.

डाॅ. शेखर यांनी 'कॅट'मध्ये दाखल केलेल्या याचिकेवर 5 फेब्रुवारीला सुनावणी झाली. आता पुन्हा 12 फेब्रुवारीला सुनावणी होऊन निकाल येण्याची शक्यता आहे. दरम्यान, दत्तात्रय कराळे यांनी नाशिक परिक्षेत्राची सूत्रे हाती घेतली आहेत. डाॅ. शेखर यांनी दाखल केलेल्या याचिकेवर काय निकाल येतो, याकडे लक्ष लागले आहे.

(Edited by Amol Sutar)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT