Kisan sabha 3 days morcha at Shirpur.
Kisan sabha 3 days morcha at Shirpur. Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

वनपट्ट्यांसाठी रणरणत्या उन्हात शिरपूर ते धुळे लाँग मार्चला सुरवात

Sampat Devgire

धुळे : वनजमीन (Forest land) करणाऱ्या शेतकऱ्यांनी वनपट्टा (Trible Farmers) मिळावा यासाठी शिरपूर तालुक्यात किसान सभेतर्फे १९८७ पासून संघर्ष सुरु आहे. आजपासून येथील हजारो शेतकरी धुळे (Dhule) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाला सुरवात केली. तीन दिवसांनी हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचणार आहे. मार्गावर ठिकठिकाणी नागरिक तसेच आदिवासी त्यांना पाठींबा देत त्यात सहभागी होत आहेत.

शासनाने १९९२ साली खंबाळे ते सांगवी रेंजवर पायी मोर्चा काढून बेकायदेशीर घेतली जाणारी फाळापट्टी बंद केली. २००२ मध्ये वन जमिनी कसणाऱ्या आदिवासी बांधवांना जमीनी पासून बेदखल करण्याचा नोटीसा बजावल्या. त्या विरोधात महाराष्ट्र राज्य किसान सभेने एल्गार पुकारला आहे. दहा हजार आदिवासींचा सांगवी रेंज जयेथे मेळावा होऊन वन विभागाने बेकायदेशीर दिलेल्या नोटीसा थांबवून न्याय मिळवून दिला.

या प्रश्नावर देशभर डाव्या पक्षांनी आक्रमकपणे लढा दिल्यामुळे तसेच मनमोहन सिंह या सरकारला डाव्या पक्षांच्या ६२ खासदारांनी वनजमिनी आदिवासींच्या नावावर कायदा बनवण्याचा अटीवर बाहेरून पाठींबा दिला. त्यामुळे वन अधिकार अधिनियम २००६ व नियम २००८ अस्तित्वात आला. दोन हेक्टर वरुन ४ हेक्टर जमीन मिळविण्यासाठी किसान सभा पाठपुरावा करीत आहे.

केला. त्या अनुषंगाने त्यानंतर स्थिती बदलत गेली. सध्या आदिवासींकडे जमीनी आहेत, परंतु जमीनीचे उतारे नसल्यामुळे त्यांना कोणत्याही शासकिय व निमशासकिय योजनांचा लाभ मिळत नाही. या प्रश्नांसाठी झोपेचे सोंग घेतलेल्या शासनाच झोप उघडण्यासाठी किसान सभेने हा एल्गार पुकारला आहे. शिरपूर तालुक्यात ११,७१८ प्रमाणपत्र धारक शेतकरी आहेत. अनेकांचे दावे प्रलंबीत आहेत. त्यांच्या न्याय हक्कासाठी आजपासून धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावरील मोर्चाला सुरवात झाली.

संघटनेचे कार्याध्यक्ष प्रा. राजु देसले, बिरसा फायटर्से संघटनेचे विभागीय अध्यक्ष विलास पावरा, अॅड. मदन परदेशी हे या मोर्चाचे नेतृत्व करीत आहेत. किसान सभेचे व इतर संघटनेचे अॅड. हिरालाल परदेशी, अर्जुन कोळी, साहेबराव पाटील, वसंत पाटील, शिलदार पावरा यांसह मोठ्या संख्येने आदिवासी शेतकरी त्यात सहभागी झाले आहेत.

आज सकाळी अकराला सांगवी येथे सभा झाल्यानंतर मोर्चाला सुरवात झाली. खदें, उटावद, सावळदे, वर्षी, दमाशी मार्गे मुक्काम केल्यावर मोर्चाचा मुकाम होईल. उद्या नरडाणा, सोनगीर व कापडणे येथे सायंकाळी सभा व मुकाम होईल. त्यानंतर मोर्चा कापडण्याहुन धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचणार आहे.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT