Ambadas Khaire, NCP Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

तुषार भोसले माफी मागा, अन्यथा फिरू देणार नाही!

केवळ विरोधाला विरोध करत, आपले पक्षप्रेम सिद्ध करण्यासाठी खटाटोप सुरु आहे.

Sampat Devgire

नाशिक : भाजपा आध्यात्मिक आघाडी प्रमुख तुषार भोसले (BJP spiritual front`s Tushar Bhosale) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (NCP national president Sharad Pawar) यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टिका केली. खरे म्हणजे भोसले याची पात्रता काय आणि तो बोलतो काय अशी स्थिती आहे. त्याने तातडीने माफी मागावी. अन्यथा त्याला शहरात फिरू देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे (NCP youth wing Ambadas Khaire) यांनी दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्षांच्या विरोधात भाजपा अध्यात्मिक आघाडी प्रमुख तुषार भोसले यांनी आपली पातळी सोडत अतिशय हीन दर्जाची टिका सोशल मिडीयावर केली. हा माणुस सतत काही तरी गरळ ओकत असतो. त्याला अध्यात्मिक या शब्दाचा अर्थ, संदर्भ तरी माहित आहेत का?. भाजप अशा लोकांचा वापर करून घेत आहे. मात्र अशी माणसे त्या पक्षालाही अडचणीत आणल्याशिवाय राहणार नाही.

श्री. खैरे म्हणाले की, भोसले यांनी केलेली टिका म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे. क्रूझ रेव्ह पार्टी प्रकरण हाताळत असलेले अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरो मधील अधिकारी समीर वानखेडे हे यांच्या विरोधारातील पुरावे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ते ना.नवाब मलिक यांनी माध्यमासमोर आणल्यानंतर भाजपाला या प्रकरणात आगपाखड होण्याचे कारण नाही.

केवळ विरोधाला विरोध करत आहेत. आपले पक्षप्रेम सिद्ध करून वफादारी दाखविण्यासाठी लहान उंचीचे भोसले यांनी सोशल मिडीयाद्वारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षांवर केलेल्या टिकेमुळे सामाजिक तेढ निर्माण होऊ नये याकरिता राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली आहे. श्री. 0भोसले यांच्या घरी समज देण्यासाठी गेले. परंतु ते भीतीपोटी घर सोडून फरार असल्याने आहे. त्या ठिकाणावरून त्यांनी तातडीने जाहीर माफी मागावी अन्यथा त्यांना नाशिक शहरात फिरू देणार नाही.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT