Ahmednagar Police Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ahmednagar Police: पोलिस-चोरांचा रेल्वेत लपाछपीचा खेळ; मनसे नेत्याच्या ज्वेलर्समधील चोरीप्रकरणी कारवाई

MNS Sumit Varma : वर्मा ज्वेलर्समधील चोरीप्रकरणी नगर पोलिसांची मोठी कारवाई करत दोघांना अटक केली.

Ganesh Thombare

प्रदीप पेंढारे

Ahmednagar News: महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे नगर जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांच्या वर्मा ज्वेलर्समधील चोरीचा गुंता उलगडला आहे. वर्मा ज्वेलर्समधील चोरीची उकल कोतवाली पोलिसांनी दहा दिवसांत केली. आठ दिवस मागावर असलेल्या कोतवाली पोलिसांचा चोरांशी धावत्या रेल्वेत लपाछपीचा खेळ रंगला होता. यात कोतवाली पोलिसांनी दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे.

अक्षयसिंग बिरुसिंग जुनी, अनमोल चरणसिंग शिकलकर या दोघांना नाशिकमधून अटक केली. नगर शहराच्या सराफ बाजारातील वर्मा ज्वेलर्सच्या दुकानात रविवारी पहाटे चोरी झाली होती. दुकानातून 24 लाख 68 हजार रुपयांचे दागिने चोरीला गेले होते. ही चोरी कोतवाली पोलिसांना आव्हान होती. नगरमधील सराफ असोसिएशनने पोलिसांना निवेदन देत चोरीचा तपास वेगाने करण्याची मागणी पोलिस अधीक्षकांकडे केली होती.

यानंतर कोतवाली पोलिस ठाण्याचे निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी चोरीची उकल करण्यासाठी तीन पथके रवाना केली. या चोरीत नाशिकमधील टोळी असल्याची माहिती समोर आली. चोरांनी वर्मा ज्वेलर्स फोडण्यापूर्वी नाशिकमधून कार चोरली होती. हीच कार घेऊन नगरच्या सराफ बाजारात येऊन वर्मा ज्वेलर्समध्ये चोरी केली.

नगर, गंगापूर, वैजापूर मार्गे चोर पळाल्याची माहिती सीसीटीव्हीच्या तपासणीत पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी चोरांचा माग काढला. चोरांनी चोरीत वापरलेली कार ही येवला रस्त्यावर बेवारस स्थितीत आढळली. यानंतर पोलिसांनी माहिती घेतल्यानंतर चोर हे मुंबईकडे पळून जाणार असल्याची माहिती मिळाली.

चोर कोणत्या रेल्वेने जाणार आहेत, याची माहिती घेत चोरीतील दोघांना धावत्या रेल्वेत कोतवाली पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले. अक्षयसिंग आणि अनमोल या दोघा सराईत गुन्हेगारांना कोतवाली पोलिसांनी अटक केली.

या दोघांकडून चोरलेले दागिने आणि विक्री केलेल्या दागिन्यातील रक्कम, असा एकूण 3 लाख 34 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल कोतवाली पोलिसांनी हस्तगत केला. सहायक निरीक्षक विश्वास भान्सी, उपनिरीक्षक प्रवीण पाटील, उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

अक्षयसिंग मोक्कातील आरोपी

अक्षयसिंग बिरुसिंग जुन्ना ही सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर मोक्कांतर्गत कारवाई झाली आहे. त्याच्याविरोधात हडपसर पोलिस ठाण्यात 12, तर वानवडी पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली.

Edited by Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT