पिंपळगाव बसवंत : थकीत वीज बिलावरून (Power supply bill) निफाड तालुक्यात महावितरणने (Mahavitaran) वीजपुरवठा खंडीत करण्याचा धडका लावला आहे. सुमारे दोन हजार कृषीपंपांटा पुरवठा खंडीत करण्यात आला. आमदार दिलीप बनकर (Dilip Bankar) व माजी आमदार अनिल कदम (Anil Kadam) यांच्याकडे वीजप्रश्नावरून हतबल शेतकरी धाव घेत आहेत. त्यामुळे आजी माजी आमदारांपुढे हा प्रश्न कसा सोडवावा हे संकट निर्माण झाले आहे.
शेतकरी आमदार दिलीप बनकर तसेच शिवसेनेचे माजी आमदार अनिल कदम भ्रमणध्वनी किवा प्रत्यक्ष भेटीला आलेल्या शेतकऱ्याचा वीज वितरणच्या अधिकाऱ्यांशी संवाद घडवून देत प्रश्नावर मधला मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत आहे. वीज प्रश्न सोडविण्यासाठी बनकर व कदम हे दोघेही प्रयत्नशील आहेत. दोघांचे समर्थक आपल्या नेत्यांने शेतकरी व वीज वितरणच्या अधिकाऱ्यांशी केलेल्या चर्चेचा व्हिडीओ पोस्ट सोशल मिडीयावर व्हायरल करीत आहे. निफाडच्या संवेदनशील राजकारणात सध्या वीज प्रश्न सोडविण्यासाठी चढाओढीचे राजकारण रंगलेले दिसते.
रब्बी हंगामातील पिकांसह द्राक्षाला पाणी देता येत नसल्याने हातातोंडाशी आलेला पिकांचा घास हिरावला जात असल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. रब्बीच्या पिकांची अद्याप काढणी नाही, द्राक्षांचे सौदेही अजून सुरू झालेले नाही. त्यामुळे शेतकऱ्याकडे थकीत वीजबील भऱण्यासाठी पैसे नाहीत. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधींकडे धाव घेतली आहे. आमदार दिलीप बनकर व माजी आमदार अनिल कदम हे वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवर शेतकऱ्यांशी संवाद घडवून देत आहेत. कधी नव्हे निफाड तालुक्यात वीज पुरवठ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
महावितरणने थकबाकी वसुलीसाठी थकीत वीजबिलात ६० टक्के सवलतीची योजना आणली. येत्या ३१ मार्चपर्यत ही सवलत सुरू असून नंतर त्यात कपात होऊन ३० टक्के माफी असणार आहे. अवघी ३५ टक्के थकबाकीदार शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदविला आहे. उर्वरित शेतकऱ्यांनी पाठ फिरविली आहे. पिंपळगाव बसवंत, ओझर, चांदोरी, सायखेडा परिसरात अद्याप दोनशे ४५ कोटी रूपयांची थकबाकी आहे. योजनेचा अवधी संपत आल्याने महावितरणचे अधिकारी अधिक आक्रमक झाले आहेत. गेल्या महिन्याभरात पिंपळगांव बसवंत, ओझर, गोदाकाठ परिसरातील तब्बल १०० रोहित्रे व त्यावरील १६०० कृषी पंपाच्या जोडणीला कात्री लावली आहे. महावितरणचा आर्थिक डोलारा ढासळत आहे. त्यामुळे वरिष्ठ पातळीवरून अधिकारी व कर्मचाऱ्यांवर वसुलीसाठी दबाव आहे.
शेतकरी झाले हतबल...
रब्बी हंगामातील गहू, कांदे, भाजीपाला, ऊस हे रब्बी हंगामातील १५ हजार हेक्टरवरील पीके शेतात उभी आहेत तर द्राक्षहंगाम आता कुठे सुरू झाला आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत आहे. वीजबील न भरलेले रोहित्राचा वीजपुरवठा खंडीत करण्याची मोहीम अधिकारी राबवित आहेत. त्यामुळे शेतकरी व वीज वितरणचे अधिकारी व कर्मचारी यांच्यात शाब्दीक चकमक उडत आहे.
---
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.