Sanjay Raut Eknath Shinde  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Raut Vs Shinde : बॅगांचे राजकारण थांबेना... शिंदे सेना राऊत यांच्यावर संतापली!

Eknath Shinde News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नाशिकचा दौरा राजकीय वादाचा विषय ठरत आहे.

Sudesh Mitkar

Nashik News, 14 May : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी नाशिक दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी आठ ते नऊ बॅगा आणल्या. त्या बॅग हेलिकॉप्टरमधून पोलिस कर्मचाऱ्यांनी उतरवल्या, असा आरोप शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला होता.

एक फोटो ही राऊत यांनी समाज माध्यमांवर व्हायरल केला होता. तो निवडणूक आयोगाला ( Election Commission ) टॅग करण्यात आला आहे. त्यावरून शिंदे गटाचे नेते चांगलेच संतापले आहेत. त्यांनी संजय राऊत यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली.

शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी या आरोपाला उत्तर दिले होते. आता शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाठ (Sanjay Shirsath) हेही त्यांच्या मदतीला धावून आले आहेत. त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत राजकीय प्रचारासोबत मुख्यमंत्र्यांच्या बॅगांचा विषय देखील चघळला जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उद्योग मंत्री सामंत यांनी बॅगा असल्या म्हणजे त्यात पैसेच असतात का? असा प्रश्न राऊत यांना केला होता. "माझ्याकडे देखील आता बॅगा आहेत. त्यात पैसे नाहीत. माझे वापरण्याचे कपडे आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टर आणि त्यातील बॅगा यावर आरोप करणे हे संजय राऊत यांच्या राजकीय प्रतिमेला साजेसे आहे. त्यांचे आरोप मी गांभीर्याने घेणार नाही," असा टोमणा सामंत यांनी राऊत यांना लगावला होता.

शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाठ यांनीही संजय राऊत यांच्या आरोपामुळे संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. राऊत यांच्या टीकेला उत्तर देताना, "राऊत यांनी मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टरमधील भागांमध्ये पैसे होते, हा नवा जावईशोध लावला आहे. पैशांचा पाऊस पाडून कोणालाही निवडणुका जिंकता येत नाहीत. निवडणुकीत पराभव होणार, हे लक्षात आल्यावर संजय राऊत बचावासाठी कारणे निर्माण करीत आहेत."

संजय राऊत यांच्या टीकेवरून शिंदे गटाच्या नेत्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संभाजीनगर दौऱ्याबाबतही प्रश्न उपस्थित केला आहेत. उद्धव ठाकरे संभाजीनगरला बॅगा घेऊन आले होते. त्यात काय होते? असा प्रश्न त्यांनी केला. उद्योजकांना भेटायला आलेल्या मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांच्याबाबत अशी विधाने करणे बरोबर नाही, असा संताप शिंदे गटाच्या नेत्यांनी व्यक्त केला. त्यामुळे एकंदरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यातील बॅगांच्या चर्चेचे गुऱ्हाळ थांबण्याची चिन्हे नाहीत.

( Edited By : Akshay Sabale )

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT