Shivsena-UBT-leader-Prathmesh-Gite-BJP-Leader-Uddhav-Nimse.webp Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

BJP Vs Shivsena UBT Politics: प्राणघातक हल्ल्यातील युवक चिंताजनक, भाजप नेते उद्धव निमसे यांची अटक पूर्व जामीनासाठी धाव!

BJP Leader Uddhav Nimse Seeks Anticipatory Bail After Deadly Attack Case: धोत्रे कुटुंबीयांवर प्राणघातक हल्ला प्रकरणावरून राजकारण तापले, हल्ल्यातील युवकाची प्रकृती चिंताजणक.

Sampat Devgire

Uddhav Nimse News: नांदूर नाका परिसरात तीन दिवसांपूर्वी धोत्रे कुटुंबीयांवर केलेल्या प्राणघातक हल्ल्याचे प्रकरण चांगलेच गाजते आहे. या प्रश्नावरून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. हल्ल्यातील जखमीची प्रकृती चिंताजनक आहे.

नांदूर नाका परिसरातील धोत्रे कुटुंबीयांवर जमावाने प्राणघातक हल्ला केला होता. त्यात उद्धव निमसे समर्थक होते, असा आरोप आहे. यामध्ये लहान मुले आणि महिलांनाही मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणात भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे यांच्यावर पीडित कुटुंबीयांनी थेट आरोप केले आहेत. त्यामुळे हे प्रकरण आता चांगलेच तापले आहे.

यासंदर्भात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाले आहेत. महानगरप्रमुख प्रथमेश गीते यांसह पदाधिकाऱ्यांनी पीडित कुटुंबीयांना घेऊन पोलीस आयुक्तांची भेट घेतली होती. पोलीस आयुक्तांनी चौकशी करून येत्या दोन दिवसात कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते.

या पार्श्वभूमीवर पोलीस कारवाईची टांगती तलवार असल्याने भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे यांनी अटकपूर्व जामीन्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. त्याने त्यांना दोन दिवस पोलिसांच्या अटके पासून संरक्षण दिले आहे. मात्र या विषयावर पिडीत कुटुंबियांचा दबाव असल्याने पोलिसांची अटकेची टांगती तलवार श्री. निमसे यांच्यावर आहे.

या हल्ल्यात जखमी झालेला युवक सनी धोत्रे याची प्रकृती चिंताजनक आहे. धोत्रे कुटुंबीयांनी पुन्हा एकदा आक्रमक होत थेट माजी नगरसेवक निमसे यांच्यावर गंभीर आरोप केले. निमसे यांनी घरात घुसून मारहाण करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

या संदर्भात हल्लेखोरांनी दक्षिणात्य चित्रपटाला लाजवील अशा पद्धतीने सशस्त्र हल्ला केला. चॉपर आणि काठ्यांचा वापर करण्यात आल्याने हल्ला झालेला युवक गंभीररित्या जखमी झाला आहे. यासंदर्भात मोठ्या प्रमाणावर जमाव घटनास्थळी जमला होता.

या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. घटना झाल्याबरोबर अज्ञात व्यक्तीने केलेले व्हिडिओ शूटिंग समाज माध्यमांवर देखील व्हायरल करण्यात आले होते. या फुटेज मध्ये निमसे समर्थकांनी हल्ला केला तेव्हा भाजपचे नेते उद्धव निमसे तेथे उपस्थित असल्याचे दिसते, असा दावा पीडित कुटुंबाने केला आहे.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा हल्ला झाला. माजी नगरसेवक उद्धव निमसे हे भारतीय जनता पक्षाचे इच्छुक उमेदवार आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने हे प्रकरण चांगलेच उचलून धरले आहे. त्यामुळे एकीकडे राजकीय दबाव आणि दुसरीकडे हल्ल्यातील जखमेची प्रकृती चिंताजनक असल्याने श्री निमसे चांगलेच अडचणीत सापडले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT