Uddhav Thackarey Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shivsena News; उद्धव ठाकरे दादा भुसेंच्या घरात घुसून देणार आव्हान!

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे येत्या 26 मार्चला मालेगाव शहरातून फुंकणार उत्तर महाराष्ट्रासाठी रणशिंग!

Sampat Devgire

मालेगाव : (Malegaon) शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे (Uddhav Thackarey) पक्षातील फुटीनंतर पहिल्यांदाच मुंबई, ठाणे (Thane) शहराबाहेर जाहीर सभा घेणार आहेत. महाराष्ट्रातील (Maharashtra) राजकीय लढ्याचे रणशिंग ते येत्या २६ मार्चला मालेगाव शहरातून फुंकतील. यानिमित्ताने ते थेट मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या मतदारसंघातूनच भुसे यांना आव्हान देणार आहेत. त्यामुळे ही सभा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाला आव्हान मानले जात आहे. (Uddhav Thackarey will challange Dada Bhuse from his home town itself)

मालेगाव शहरातील मसगा महाविद्यालय व पोलिस कवायत मैदानावर न भूतो न भविष्यती अशी सभा होईल, असा विश्वास संयोजकांनी व्यक्त केला आहे. यानिमित्ताने युवानेते अद्वय हिरे, संपर्क प्रमुख जयंत दिंडे, जिल्हा प्रमुख विजय करंजकर यांनी आज सकाळी अमेय लॉन्स येथे संयुक्त पत्रकार परिषदेत माहिती दिली.

श्री. हिरे म्हणाले, की पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा उत्तर महाराष्ट्र मेळावा व सभा २६ मार्चला सायंकाळी पाचला होणार आहे. सभा यशस्वी करण्यासाठी शहर, जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात संबंधित जिल्ह्यातील पदाधिकारी जनसंपर्क दौरा करणार आहेत.

आगामी काळात उत्तर महाराष्ट्रात शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष पहिल्या क्रमांकाचा करायचा आहे. त्यासाठी सगळ्यांनी कंबर कसली आहे. सभेसाठी धुळे लोकसभा हे आमचे केंद्र आहे. या सभेत असंख्य कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करतील. पक्षात नव्याने येणाऱ्यांचे स्वागत आहे.

याचवेळी शिवसेनेच्या येथील मध्यवर्ती कार्यालयाचे लोकापर्ण होईल. शिवसेनेत कोणते प्रमुख नेते प्रवेश करणार हे आत्ताच जाहीर करु शकत नाही. अनेकांनी संपर्क केला आहे. काहींशी चर्चा सुरु आहे.

सभा यशस्वीतेसाठी विविध समित्यांचे गठन करण्यात आले आहे. येत्या दोन आठवड्यात समित्यांची घोषणा होईल असे श्री. गायकवाड यांनी सांगितले. शिवसेना नेते संजय राऊत आदींसह सर्व प्रमुख नेते, उपनेते या सभेला उपस्थित राहतील. यावेळी विठोबा छरंग, सुरेश पवार, नंदलाल शिरोळे, कैलास तिसगे, भरत पाटील, जितेंद्र देसले, विष्णू पवार, संजय निकम, मनोज जगताप, प्रविण देसले, सनी जगताप, महेश पवार आदी कार्यकर्त्यांवर विविध जबाबदाऱ्या आहेत.

शिवसेना-उध्दव ठाकरे गटाच्या प्रमुख नेते, पदाधिकाऱ्यांनी सभेसाठी निश्‍चित केलेल्या मसगा व पोलिस कवायत मैदानाची पहाणी केली. सभेच्या परवानगीसाठी पोलिस प्रशासन व संबंधित यंत्रणांकडे अर्ज पाठविण्यात आला आहे. यानंतर या पदाधिकाऱ्यांनी माजी आमदार रशीद शेख यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यापुर्वी शहरात युवानेते आदित्य ठाकरे यांचा धावता दौरा झाला होता. अद्वय हिरे यांच्या प्रवेशानंतर पक्षातील कार्यकर्त्यांचे बळ वाढले आहे. पक्षप्रमुखांच्या सभेनंतर कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य येईल. पक्ष बांधणीस मजबुती मिळेल.

यावेळी उपनेते सुनील बागुल, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी महानगरप्रमुख महेश बडवे, देवानंद बिरारी, पवन ठाकरे, लकी खैरनार, प्रमोद शुक्ला, राजाराम जाधव, नथु जगताप, काशिनाथ पवार, अशोक आखाडे, डी. जे. सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT