मालेगाव : (Malegaon) बंदरे व खनिकर्म मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांना त्यांच्याच होमपीचवर अडकवण्याची व्युहरचना त्यांच्या स्थानिक विरोधकांनी केली आहे. त्यात शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackarey) यांची जाहीर सभा महत्त्वाची खेळी ठरण्याची शक्यता आहे. यानिमित्ताने लोकसभेसाठी तयारी करणारे पुत्र अविष्कार भुसे (Avishkar Bhuse) आणि विधानसभेसाठी दादा भुसे या दोघांच्या मार्गात अडथळे निर्माण होणार आहेत. (Bhuse`s local opponent will be organized in Malegaon)
धुळे लोकसभा मतदारसंघ डोळ्यापुढे ठेऊन शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा येत्या 26 मार्चला मालेगाव येथे होत आहे. या निमित्ताने दादा भुसे यांच्याबरोबरच लोकसभा निवडणुकीची तयारी करणारे त्यांचे पुत्र अविष्कार भुसे यांच्या अडचणींत भर पडण्याची शक्यता आहे.
भुसे विरोधक यानिमित्ताने संघटीत होत आहेत. निवडणुकीला पुरेसा वेळ असताना या घडामोडींना वेग आल्याने भुसे यांची झोप उडाल्यास नवल नाही.
स्थानिक नेते अद्वय हिरे यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला. ते भुसे यांचे कट्टर विरोधक आहेत. यंदा त्यांनी केवळ वैयक्तीक राजकारण न करता दुरदृष्टीने अन्य विरोधकांना एकत्र आणण्याचे काम त्यांनी सुरु केले आहे. त्यात अप्रत्यक्षपणे भाजपचे नेते मदन गायकवाड यांचीही त्यांना अप्रत्यक्ष मदत मिळेल. बंडूकाका बच्छाव यांसह विविध स्थानिक नेते एकत्र आलेले दिसले. अन्य काही लोक ठाकरे यांच्या सभेच्या वेळी प्रवेश करतील.
त्यातून हे विरोधक धुळे लोकसभा व मालेगाव बाह्य विधानसभा या दोन्ही मतदारसंघांतील उमेदवारी कोणी करावी हे धोरण ठरवतील. राज्यात सध्या शिवसेनेत पुट पडल्याने गोंधळाची स्थिती आहे. शिंदे गट भाजपसोबत आहे. ती त्यांची सोय आहे. मात्र भाजप गैरसोय आहे. भाजप नेत्यांनी केलेल्या विधानातून ते वारंवार व्यक्त झाले आहे. एकीकडे खुद्द भाजप शिंदे गटाच्या मतदारसंघांवर डोळा ठेऊन असताना भाजपकडे असलेला धुळे लोकसभा मतदारसंघ ते शिंदे गटाच्या अविष्कार भुसे यांना कसा सोडतील?. त्यामुळे शिंदे गटाची राजकीय वाटचाल अतिशय वेगाने एका कोंडीकडे सुरु आहे.
त्यातच मालेगावमद्ये त्यांचे विरोधक एकवटल्यास दादा भुसे यांची राजकीय अस्वस्थता नक्कीच वाढू शकेल. निवडणुका जवळ आल्यावर राजकीय पक्षांची विभागणी स्पष्ट होईल, तेव्हा नेत्यांनाही भूमिका घ्यावी लागेल. दादा भुसे यांच्याबाबत ते उद्धव ठाकरे यांचेच आहेत, असा एक गोड समज त्यांच्या मतदारसंघात पसरलेला असल्याचे बोलले जाते.
सध्या एकत्र येत असलेल्या विरोधकांत देखील काही नेते भुसे यांच्याशीच एकनीष्ठ आहेत. ते ऐनवेळी कच खातील, असे बोलले जाते. त्यामुळे कार्यकर्ते उघड भूमिका घेत नाही. थेट उद्धव ठाकरे जर मालेगावला आले तर हा गैरसमज गळून पडेल. त्याने भुसे यांटी अडचण वाढले. ही कोंडी फोडण्यासाठी, विरोधकांचे ऐक्य निष्फळ करण्यासाठी श्री. भुसे काय डाव टाकतात त्यावर मालेगावचे राजकारण ठरेल. तसे डाव टाकण्यात भुसे तरबेज आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.