Uddhav Thackrey Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Uddhav Thackrey Politics: ठाकरे इफेक्ट; शिवसेनेत जोरदार इन्कमिंग, मनसे, भाजपला झटका!

Uddhav Thackrey; ex Mayor Murtdak, ex MLA Apurv Hiray many joins shivsena- विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातच माजी महापौर, माजी आमदारांसह नगरसेवकांनी बांधले शिवबंधन.

Sampat Devgire

Nashik Politics: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा नाशिकचा दौरा खऱ्या अर्थाने फलद्रूप ठरला. यावेळी शिवसेनेत जोरदार इन्कमिंग झाले. निवडणुकीच्या धामधुमीतच त्यांनी एकाच वेळी भाजप, मनसे आणि विरोधकांना मोठा झटका दिला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांची आज नाशिकला सभा होत आहे. मात्र त्यांच्या या दौऱ्याच्या पूर्वसंध्येलाच मनसेला जोरदार सेटबॅक बसला. माजी महापौर अशोक मुर्तडक यांसह विविध पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांना जय महाराष्ट्र केला आहे. हा पक्षप्रवेश म्हणजे नाशिक मधील भविष्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीचे संकेत मानले जातात.

शुक्रवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची नाशिकला सभा झाली. ही सभा उद्धव ठाकरे यांना सातत्याने राजकीय लक्ष्य करणाऱ्या भारतीय जनता पक्ष आणि मनसेला मोठा धक्का देणारी ठरली. विशेषतः विविध सत्तास्थाने काबीज केलेल्या भाजपला हा मोठा झटका मानला जातो. त्याचा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावर आणि निकालावर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे.

हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर झालेल्या सभेत भाजपच्या माजी नगरसेविका इंदूबाई नागरे, पल्लवी पाटील, मधुकर हिंगमिरे तसेच औद्योगिक कामगार आघाडीचे अध्यक्ष विक्रम नागरे यांनी शिवसेना ठाकरे पक्षात प्रवेश केला. मनसेच्या माजी महापौरांसह विविध नेत्यांनीही शिवबंधन बांधले. मनसेला गेले काही दिवस सतत गळती लागली आहे. त्यामुळे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांत निरूत्साहाचे वातावरण आहे.

चर्चेचा विषय ठरला, तो वंचित बहुजन आघाडीचे उत्तर महाराष्ट्राचे नेते पवन पवार यांचा प्रवेश. त्यांच्यासमवेत असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. पवन पवार यांनी 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत उमेदवारी केली होती. त्यावेळी त्यांना एक लाख 9 हजार मते मिळाली होती. वंचित बहुजन आघाडीचे ते प्रमुख नेते मानले जातात.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकाच वेळी वंचित बहुजन आघाडीसह मनसे आणि भाजपला मोठा शॉक देण्यात उद्धव ठाकरे यशस्वी ठरले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या दृष्टीने हे पक्षप्रवेश राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे मानले जातात. उमेदवारांनीच त्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. या निमित्ताने उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी एकाच वेळी त्यांच्या विविध प्रतिस्पर्ध्यांना ठाकरी झटका दिला. त्यातून आगामी राजकारणाची पेरणी देखील झाली आहे.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT