Valmik Karad Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Valmik Karad: वाल्मिक कराडची परदेशातही ‘माया’?, सीआयडी, एसआयटीकडून शोध!

Valmik Karad; shocking, CID Suspicion, Karad may Have properties in abroad-बीडचे वादग्रस्त वाल्मीक कराड यांच्या बाबत आता अनेक धक्कादायक खुलासे पुढे येऊ लागले आहेत.

सरकारनामा ब्युरो

Valmik Karad News: मस्साजोग (बीड) येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने वाल्मीक कराड अचानक प्रकाशात आला आहे. एस.आय.टी. आणि सी.आय.डी. चे पथक कराड याची चौकशी करीत आहे. यामध्ये वाल्मीक कराड याची संपत्ती किती याचाही शोध घेतला जात आहे.

पुण्याचे माजी नगरसेवक खाडे यांच्या माध्यमातून फर्ग्युसन रोड येथे वाल्मीक कराड यांनी व्यावसायिक इमारतीत दोन कार्यालय खरेदी केल्याचे उघड झाले आहे. यावरून आता एसआयटी वाल्मीक कराड यांच्याकडे संपत्ती किती आणि मालमत्ता कोणत्या याचा कसोशीने शोध घेत आहे. यामध्ये अनेक धक्कादायक बाबी पुढे येण्याची शक्यता आहे.

`सीआयडी`ने यासंदर्भात काही खुलासे केले आहेत. मालमत्तांचा शोध घेताना वाल्मीक कराड यांच्या उत्पन्नाचे स्त्रोत पाहिले जात आहेत. यावरून वाल्मीक कराड याची परदेशातही मालमत्ता असण्याची शक्यता आहे काय? त्या दिशेने आता शोध घेतला जात आहे.

वाल्मीक कराड हा उद्योजक, व्यापारी, प्रगतशील शेतकरी किंवा अगदीच शेअर बाजारातील ब्रोकर किंवा सल्लागार या पैकी कोणीही नाही. तो एक ऊसतोड कामगाराचा मुलगा आहे. भाजपचे नेते (कै) गोपीनाथ मुंडे यांच्याकडे तो काही काळ घरगडी होता. असे असताना त्याच्याकडे एवढी संपत्ती आली कुठून? असा प्रश्न निर्माण होतो. त्याच्या संपत्तीची माहिती अनेकांसाठी धक्कादायक ठरली आहे.

विशेष म्हणजे वाल्मीक कराड हा नियमितपणे आयकर विवरणपत्र सादर करत असल्याचे तपासात आढळले आहे. यासंदर्भात एक बातमी देखील आली आहे. गमतीचा भाग म्हणजे सामान्य करदात्यांना १५ ते २० टक्क्याच्या स्लॅबमध्ये कर भरावा लागतो. वाल्मीक कराड याने वार्षिक ९६ लाख रुपये एवढा प्राप्तिकर भरल्याचे पुढे आले आहे.

संशयीत कराड याने नियमित आयकर स्लॅब नुसार कर आणि त्यावरील सरसर्च असे सगळेच त्याने अदा केले आहे. त्यामुळे अल्पशिक्षित कराड याचा सल्लागार कोण? हा देखील तपासाचा भाग ठरू शकतो. बेकायदेशीर मार्गाने आलेले उत्पन्न अधिकृत करून देणारी यंत्रणा तर त्याने निर्माण केली नव्हती ना, असा संशय येतो.

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास करताना पोलिसांना नुकतेच एक व्हिडिओ फुटेज हाती लागले आहे. या फुटेज मध्ये सुदर्शन घुले यांच्या कार्यालयातून वाल्मीक कराड बाहेर पडताना दिसत आहेत. त्याच्यासोबत केज पोलीस ठाण्याचे निलंबित पोलीस निरीक्षक राजेश पाटील तसेच सुदर्शन घुले आणि प्रतीक घुले आहेत. यातून पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.

वाल्मीक कराड यांच्या दोन पत्नी आहेत. एका पत्नीच्या नावाने पुण्यामध्ये सदनिका तसेच फर्ग्युसन रोड येथील व्यवसायिक इमारतीत कार्यालय खरेदी केल्याचे स्पष्ट झाले आहे. अद्याप कराड यांची बरीचशी संपत्ती आणि तिचे विवरण मिळू शकलेले नाही. अनेक ठिकाणी त्यांच्या मालमत्ता असाव्यात या दृष्टीने आता `सीआयडी`चे पथक तपास करीत आहे. एकंदरच एका अल्पशिक्षित आणि ऊसतोड कामगाराच्या मुलाची कोट्यावधींची ही संपत्ती आणि तिचा स्त्रोत हा सीआयडीला देखील तोंडात बोट घालायला लावणारा ठरला आहे.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT