Varun Sardesai Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Varun Sardesai: आमदार, खासदार सोडून गेल्याने बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना संपत नसते!

Balasaheb Thackeray's Legacy Keeps Shiv Sena Strong After Defections: युवा सेनेचे सचिव वरून सरदेसाई यांनी दिले युवा कार्यकर्त्यांना पक्षात पदोन्नतीचे संकेत.

Sampat Devgire

Shiv Sena MLAs Leaving: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष सक्रिय झाला आहे. उत्तर महाराष्ट्रातील युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांची ऑनलाइन बैठक घेण्यात आली. वेळी युवा सेनेच्या कार्यक्षम पदाधिकाऱ्यांना आगामी निवडणुकीत संधी आणि पक्षात पदोन्नती देण्याचे संकेत देण्यात आले.

शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांनी उभी केलेली एक प्रबळ संस्था आहे. मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी हा पक्ष सतत झटला आहे. सत्तेसाठी आणि सरकारी दबाव तंत्राने काही लोकांनी पक्ष सोडल्याने शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष संपणार नाही, विश्वास युवासेनेचे सचिव वरून सरदेसाई यांनी व्यक्त केला आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे ठाकरे बंधू एकत्र आले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात वीस वर्षांनी मोठा बदल पाहायला मिळत आहे. त्याचे राज्यातील जनतेने प्रचंड स्वागत केले आहे. स्वागतामुळे सत्ताधारी महायुतीला धडकी भरली आहे, असे सरदेसाई म्हणाले.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उमेदवारीचे सूत्र आणि उमेदवार कोण असतील हा स्थानिक चर्चेचा विषय नाही. वरिष्ठ या संदर्भात योग्य वेळी निर्णय घेतील. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले असून आता शिवसेना आणि मनसे यांच्या युतीबाबत कार्यकर्त्यांनी मनात कोणतीही शंका ठेवू नये.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मत चोरी संदर्भात सप्रमाण भूमिका मांडली आहे. उत्तर देण्यासाठी निवडणूक आयोग पुढे येत नाही. भाजपचे नेते निवडणूक आयोगाची बाजू मांडत आहे. तेच सर्व काही दडले आहे. मतचोरीमुळेच विधानसभा निवडणुकीचे निकाल महाविकास आघाडी साठीच नव्हे तर महायुतीसाठी सुद्धा धक्कादायक ठरले आहेत. अनेक मंत्र्यांबाबत जनतेत प्रचंड रोष असताना ते निवडून कसे आले याचे त्यांनाही आश्चर्य वाटत असावे.

भारतीय जनता पक्षाने स्वातंत्र्य दिनाला मांस विक्री बंदी जाहीर केली आहे. या बंदी संदर्भात शिवसेनेने आधीच नाराजी व्यक्त केली आहे. भारतीय जनता पक्षाने हा निर्णय घेतला आहे. भाजपने निर्णय घेतला म्हणजे या एकट्या पक्षाचा निर्णय हीच देशाची विचारसरणी होऊ शकत नाही. भाजपला या जनविरोधी निर्णय यांची किंमत मोजावी लागेल, असा इशारा सरदेसाई यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT