Vasant Gite Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Vasant Gite Politics: शिवसेना ठाकरे पक्षाचा महापालिकेला कडक इशारा, खाजगीकरण थांबवा अन्यथा...

Shivsena Warns Municipal Corporation Stop Privatization or Face Action: नाशिक महापालिकेने आता अतिक्रमण निर्मूलनाच्या कामाचे खाजगीकरण करण्याची प्रक्रीया सुरू केली आहे.

Sampat Devgire

Shiv Sena Thackeray Group News: राज्यात महायुतीचे सरकार आहे. नाशिक महापालिकेवर प्रशासक नियुक्त करण्यात आला आहे. त्यामुळे महापालिकेवर राज्य शासनाचे संपूर्ण नियंत्रण असूनही प्रशासकीय कामकाजाचा मात्र बोजवारा उडाल्याचे चित्र आहे.

महापालिकेने विविध सेवा आता थेट खाजगीकरणाच्या माध्यमातून करण्याचे सुरू केले आहे. त्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटले आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते माजी आमदार वसंत गीते यांनी याबाबत महापालिकेला थेट इशारा दिला आहे.

महापालिका आपल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यात सक्षम नसल्याचे सध्याचे चित्र आहे. अशा सखी स्तरावर सगळीकडे गोंधळाची स्थिती आहे. त्यामुळे नाशिक शहरातील सगळ्यात कामकाजाचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. महापालिका प्रशासनाला हे झेपत नसल्यास सबंध महापालिकेचेच खाजगीकरण करावे, असा टोला माजी आमदार गीते यांनी लगावला आहे

विरोधकांचा संताप होण्याचे कारणही तसेच घडले आहे. महापालिकेने नुकतेच पंचवटी विभागातील अतिक्रमण निर्मूलन कामासाठी ३.८७ कोटींची निविदा प्रसिद्ध केली आहे. शहराच्या उर्वरित पाच विभागांसाठी स्वतंत्र १३.०२ कोटींची निविदा प्रसिद्ध झाली आहे. महापालिकेचा अतिक्रमण निर्मूलन विभाग कार्यरत असून त्यात पोलिसांचा देखील समावेश आहे. असे असताना खाजगीकरणातून अतिक्रमण निर्मूलन मोहीम हाती घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाबाबत सातत्याने प्रश्नचिन्ह निर्माण होत आले आहे. या विभागातील अनेक कर्मचारी अतिक्रमण करणाऱ्या नागरिकांच्या संपर्कात असतात. त्यामुळे कोणतीही कारवाई परिणामकारक होत नाही. यापूर्वी काही कर्मचाऱ्यांवर प्रशासनाने कारवाई देखील केली होती. तरीही हा विभाग होता तसाच आहे.

या स्थितीत कोट्यावधी रुपये खाजगीकरणावर खर्च करावे लागत आहेत. त्यामुळे महापालिकेचा अतिक्रमण निर्मूलन विभागाचा पांढरा हत्ती पोसायचा तरी का? असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने याबाबत आक्रमक आहे. त्यामुळे अन्य विरोधक काय करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT