Eknath Khadse, Girish Mahajan Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

खडसेंना सावधानतेचा इशारा! महाजन-पाटलांना उर्जा, देवकर, मोरे, पाटलांच्यामुळे 'राष्ट्रवादी'ला सलाईन!

Jalgaon District Milk Union Election : जिल्हा सहकारी दूध संघाच्या निवडणुकीचे निकाल जाहिर झाले

कैलास शिंदे, जळगाव

जळगाव : जिल्हा सहकारी दूध संघाच्या निवडणुकीचे निकाल जाहिर झाले. पॅनल आणि पक्षीय गणित असले तरी मतदारांनी चाणक्षपणे मतदान केले आहे. 'क्रॉस वोटींग' मोठ्या प्रमाणात झाले आहे. त्यामुळे जिल्ह्याचे सद्याचे राजकीय चित्रही समोर आले आहे. राज्याचे मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) व शिवसेनेतून फुटून शिवसेना (Shivsena) शिंदे गटात गेलेले गुलाबराव पाटील यांना या विजयातून उर्जा मिळाली आहे.

एकनाथ खडसे यांना आगामी काळात राजकीय क्षेत्रातही सावधानतेचा ईशारा मिळाला आहे. तर गुलाबराव देवकर, आमदार अनिल पाटील, पराग वसंतराव मोरे, प्रमोद पांडूरंग पाटील यांनी विजय मिळवून 'राष्ट्रवादी'ला सलाईन दिली आहे. तर मंगेश चव्हाण यांचे नेतृत्व उजळून निघाले आहे. आगामी काळातील निवडणुकीसाठी महाविकास आघाडीला मोठे आव्हाण असणार आहे.

जळगाव जिल्हा दूध संघाच्या संचालकपदाची निवडणूक 'सहकार' गटाची असली तरी ती खऱ्या अर्थाने पक्षीय पातळीवर लढली गेली असे म्हटले जाते. माजी मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी होती, त्यांचे सहकार पॅनल तर राज्याचे मंत्री गिरीश महाजन व गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजप-शिंदे गट होता. त्यांचे शेतकरी पॅनल होते.

प्रचार करतांना पॅनल व पक्षीय गटाच्या माध्यमातून संयुक्त प्रचार झाला असला तरी मतदारांनी दिलेला कौल मात्र, बरेच काही सांगून जात आहे. मतदारांनी पॅनल टू पॅनल मतदान न करता अगदी चाणक्षपणे व उमेदवार शोधून मतदान केले आहे. १९ मते देतांना मतदारांनी आपल्या उमेदवारांना बरोबर शिक्का दिला आहे. त्यामुळे यातून त्यांनी राजकीय नेत्यांना धडा दिला आहे.

मतांचे बुथनिहाय परिक्षण केल्यास तालुकानिहाय तसेच राखीव मतदार संघात एखादा तालुका वगळल्यास सर्वच मतदार संघात असमान मते आहेत. त्यामुळे उमेदवारांनी पॅनलसोबत वैयक्तीक विजयासाठीही वेगळी कंबर कसल्याचे दिसत आहे. त्यातून काही उमदवारांना यश आले, काही उमेदवार मात्र त्यात अपयशी ठरले.

खडसेना सावधानतेचा ईशारा

एकनाथ खडसे यांनी पॅनलचे नेतृत्व केले, त्यांच्या पत्नी विद्यमान चेअरमन मंदाकिनी खडसे यांनी निवडणूक लढविली त्यांच्या विरूध्द चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी मोठे आव्हान उभे केले होते. मंदाकिनी खडसे यांचा तब्बल ७६ मतांनी पराभव झाला आहे. खडसे यांना भुसावळ, बोदवड, मुक्ताईनगर तालुक्यांनी मोठे मताधिक्य दिले.

एरंडोल तालुक्यातही त्यांना चव्हांणांच्या बरोबरीने मते मिळाली परंतु इतर तालुक्यात मात्र त्यांच्या मतांची मोठी घसरण झाली आहे. खडसे यांनी आपली संपूर्ण ताकद या विजयासाठी लावली होती. मात्र, या पराभवातून एकनाथ खडसे यांना राजकारणात सावधानतेचा ईशारा मिळाला आहे, हे नाकारून चालणार नाही. त्यामुळे खडसे यांना आगामी काळात यशासाठी त्यांना आपले राजकीय पवित्रे बदलावी लागतील.

महाजन-पाटील यांना उर्जा पण…

गिरीश महाजन व शिवसेना शिंदे गटाचे नेते व राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना या विजयाने उर्जा मिळाली आहे. सहकार क्षेत्रात गुलाबराव यांच्या या यशाने पर्दापण झाले आहे. तसेच त्यांच्या गटाला तब्बल १५ जागा मिळाल्याने त्यांचे यश अधोरेखीत झाले आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद, पालिका निवडणुकीच्या यशाची नांदी ते या यशातून शोधत आहे. मात्र, विरोधकांच्या आरोपाचे 'पेटी' 'खोका'हे शुक्लकाष्ट त्यांच्या मागे राहणार आहे, हे त्यांना विसरता येणार नाही.

देवकर, मोरे, पाटलांचा विजय

जिल्हा बँकेचे अध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते गुलाबराव देवकर यांच्या छाया देवकर, राष्ट्रवादी चे माजी खासदार वसंतराव मोरे यांचे चिरंजीव पराग मोरे, अमळनेरचे राष्ट्रवादी चे आमदार अनिल भाईदास पाटील व चाळीसगावचे राष्ट्रवादीचे प्रमोद पांडूरंग पाटील यांच्या विजयामुळे महाविकास आघाडीला दिलासा आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला सलाईन मिळाली आहे. मात्र, भाजपचे मंगेशशास्त्र मुक्ताईनगरातून यश मिळविते. मात्र, त्याच चाळीसगावात हे अस्त्र फेल होते. त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे पाटील यशस्वी होतात. हे कोडे सोडवायला तज्ञाची गरज नाही. त्यामुळे राष्ट्रवादीच्या या चार विजयांनी बरेच काही राजकीय गणिताचे कोडे आगामी काळात दिसणार आहेत.

त्यात माजी आमदार दिलीप वाघ हे कोणाचे? याचेही अद्याप कोडेच आहे. ते आगामी विधानसभेपर्यंत सुटेल. पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र पाटील यांचा चार मतानी झालेला पराभव मात्र पक्षाला जिव्हारी लागणारा आहे. राष्ट्रवादीचे संजय पवार यांनी उघड भूमिका घेवून भाजप-शिंदे गटाकडून निवडणूक लढविली. त्यांना विजय मिळाला आहे. मात्र, ते अद्यापही राष्ट्रवादीतच असल्याचा दावा करीत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीला आता आपली दिशा ठरवावी लागणार आहे हे निश्‍चीत आहे.

निवडणुकीत शिंदे-भाजप गट दिसत आहे, महाविकास आघाडी असली तर या ठिकाणी राष्ट्रवादीच ठळक दिसली आहे, शिवसेना (ठाकरे गट), कॉंग्रेसही दिसत नाही. त्यामुळे 'महाविकास' आघाडीचे अपयश म्हणणे कितपत योग्य ठरेल असा प्रश्‍नही आता आहे. मात्र, आगामी काळात होणाऱ्या निवडणूकीसाठी 'महाविकास' आघाडीला यशासाठी वेगळी रणनीती आखावी लागणार हे मात्र या निवडणुकीने दाखवून दिले आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT