Vinayak Deshmukh Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Vinayak Deshmukh News : विनायक देशमुखांचा राजीनामा, तर हेमंत ओगले काँग्रेसबरोबर ठाम!

Maharshtra Congress News : अशोक चव्हाण आणि राधाकृष्ण विखेंचे काँग्रेसमधील जुने समर्थक भाजपच्या वाटेवर

Pradeep Pendhare

Ahmednagar Congress News : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपचे कमळ हातात घेतल्यानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. नगरमधील त्यांचे खंदे समर्थक आणि काँग्रेसमधील ज्येष्ठ पदाधिकारी विनायक देशमुख यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस हेमंत ओगले यांनी मात्र बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वात काँग्रेसमध्येच काम करणार असल्याचा दावा केला आहे. हे दोघेही चव्हाण आणि विखे समर्थक मानले जातात.

काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस हेमंत ओगले यांनी ठामपणे भूमिका मांडत आपण काँग्रेसबरोबर ठामपणे उभे आहोत, असा दावा केला आहे. हेमंत ओगले म्हणाले, "अशोक चव्हाण हे नाईलाजास्तव भाजपमध्ये गेले आहे. मी पहिल्यापासून काँग्रेसमध्ये आहे. शिर्डीतून लोकसभा निवडणुकीची तयारी केली आहे. प्रदेशकडे मागणी केली आहे. गेली 17 वर्षांपासून काँग्रेसबरोबर आहे.

गेल्या निवडणुकांमध्ये सहा राज्यात काम केले आहे. अडीच वर्षांपासून सक्रिय असून, उत्तर महाराष्ट्रातील बूथ केंद्रावर काम करत आहोत". तसेच, नगर जिल्ह्यात आणि राज्यात बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काम करत राहू, असा दावा हेमंत ओगले यांनी केला आहे.

काँग्रेसचे 32 वर्षे जुने पदाधिकारी विनायक देशमुख यांनी त्यांच्या प्रदेश सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्याकडे त्यांनी राजीनामा पाठवला आहे. विनायक देशमुख यांनी अगदी तीन ओळीत पक्षाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा देताना त्यांनी कोणतेही कारण दिलेले नाही. परंतु विनायक देशमुख हे अशोक चव्हाण यांच्यासह राधाकृष्ण विखे यांचे समर्थक मानले जातात.

अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर नगर जिल्ह्यातून विनायक देशमुख काँग्रेस पक्ष सोडतील, अशी चर्चा होती. त्यानुसार तसे झाले देखील. विनायक देशमुख हे काँग्रेसमध्ये असताना त्यांनी नगर जिल्ह्यात विविध सामाजिक आणि राजकीय प्रयोग केले.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याशी त्यांचे नाते येते. तसेच राजकारणातील जुने पदाधिकारी असल्याने त्यांचे सर्वच पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेत्यांशी संबंध आहे. राधाकृष्ण विखे यांचे ते समर्थक आहेत. नाशिक पदवीधर निवडणुकीवेळी सत्यजीत तांबे यांनी काँग्रेसशी बंड केले होते. त्यावेळी तांबे आणि थोरात यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी होत होती. त्यावेळी विनायक देशमुख हे पक्षाकडे याबाबत कठोर आणि ठाम भूमिकेत दिसले.

दरम्यान, अशोक चव्हाण (Ashok Chavan) आणि राधाकृष्ण विखे यांचे काँग्रेसमध्ये अजूनही मोठ्याप्रमाणात समर्थक आहेत. हे समर्थक या दोघा नेत्यांना मानणारे आहेत. चव्हाण आणि विखे आता एकत्र आल्याने हे समर्थक भाजपमध्ये येतील, असे मानले जात आहे.

नगर काँग्रेसमध्ये गटबाजी उफळली -

नगर शहर आणि ग्रामीण काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून अंतर्गत धुसफूस वाढली आहे. राधाकृष्ण विखे(Radhakrishna Vikhe) यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर बाळासाहेब थोरात यांचा नगर जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये वरचष्मा आहे. त्यामुळे बाळासाहेब थोरात जे ठरवतील, ते नगर जिल्हा काँग्रेसमध्ये होते. राजेंद्र नागवडे आणि त्यांच्या पत्नी अनुराधा नागवडे यांनी काँग्रेस सोडल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात सामील झाले. अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडल्यानंतर आता संपूर्ण राज्यातील काँग्रेसमध्ये अस्वस्थता वाढली आहे.

नगर जिल्ह्यातील जुने काँग्रेसचे पदाधिकारी जे स्लीप मोडमध्ये आहेत, ते एकमेकांना संपर्क करून पुढच्या रणनीतीची चाचपणी करत आहे. काहीतरी निर्णय घेऊ, अशी चर्चा होत आहे. यातच ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसमधील खद्खद् समजावून घेत, मार्ग काढवा, असेही काही काँग्रेसचे जुने पदाधिकारी म्हणत आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT