Brij Kishor Dutt Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Vote Chori Politics: काँग्रेस नेत्यांनी भाजपला घेरले, 'वोट चोरी' हा भाजपच्या सत्ता काळातील स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा भ्रष्टाचार!

Congress calls vote theft the biggest corruption since independence: काँग्रेस नेते ब्रिज किशोर दत्त यांचा आरोप, वोट चोरीच्या माध्यमातून भाजपचा देशातील लोकशाही संपवण्याचा कट.

Sampat Devgire

What is the vote chori controversy accused by Congress against BJP?: लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी बुधवारी निवडणूक आयोगावर हायड्रोजन बॉम्ब टाकला. मत चोरीचा गंभीर प्रकार त्यांनी उघडकीस आणला. त्याच्या समर्थनार्थ काँग्रेसने देशभरात निदर्शने केली.

काँग्रेसचे नाशिक शहर प्रभारी व सचिव ब्रिज किशोर दत्त यांनी केंद्रातील सरकारवर गंभीर आरोप केले. केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार जनतेच्या मनातले सरकार नाही. वोट चोरी करून केंद्रातील सरकार सत्तेत आले आहे, असा आरोप त्यांनी केला.

आगामी काळात काँग्रेस निवडणूक आयोगाच्या माध्यमातून भाजप करीत असलेला भ्रष्टाचार उघडकीस अनिल. मतदार यादी मध्ये मोठ्या प्रमाणावर त्रुटी आणि दुबार नावे आहेत. त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर बोगस मतदान होते.

निवडणूक आयोगावर सप्रमाण आरोप केल्यानंतर थातूरमातूर उत्तर देण्याचा प्रयत्न होतो. विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत अनेक त्रुटी जनतेसमोर आणल्या. त्याची धास्ती घेतल्याने निवडणूक आयोगाने सॉफ्टवेअर बदलले. काही लिंक बंद केल्या. हा राहुल गांधी यांची धास्ती घेतल्याचा परिणाम आहे.

काँग्रेसच्या नाशिक शहर कार्यालयासमोर "वोट चोर गद्दी छोड"ही मोहीम राबविण्यात आली. यासाठी नागरिकांना पाठिंबा म्हणून सह्या करण्याचे आवाहन करण्यात आले. त्यावेळी कार्यकर्त्यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच निवडणूक आयोगाच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर घोषणा दिल्या.

देशाचे स्वातंत्र्य आणि लोकशाही वाचविण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अभियान सुरू केले आहे. आयोगाचे गैरव्यवहार त्यांनी पुराव्यासह जाहीर केले आहेत. मी काळात नागरिकांनी त्याला मोठा पाठिंबा देऊन भाजपच्या बोगस मतदान आणि गैरप्रकारांना उधळून लावावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.

काँग्रेसचे शहराध्यक्ष आकाश छाजेड माजी नगरसेवक शाहू खैरे व चला खैरे यांसह विविध पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. भाजपाचा निवडणूक गैरव्यवहार आगामी काळात घराघरात पोहोचविण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. यानिमित्ताने काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोग आणि भाजप यांच्या विरोधात सुरू केलेली मोहीम अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT