NCP, Jalgaon News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांसमोर '५० खोके एकदम ओके'च्या घोषणांचा इशारा; NCP कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात

Jalgaon : मुख्यमंत्री शिंदे आज जळगाव जिल्ह्याच्या दौर्‍यावर आहेत.

सरकारनामा ब्यूरो

जळगाव : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या (Eknath Shinde) जळगाव दौऱ्याआधी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांच्या दौऱ्यात आंदोलन करण्याचा इशारा या कार्यकर्त्यांकडून देण्यात आला होता. या कारणावरून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. '५० खोके एकदम ओके', अशा घोषणा देऊन कार्यकर्ते आंदोलन करणार होते. (NCP, Jalgaon Latest News)

मुख्यमंत्री शिंदे आज जळगाव जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले आहेत. आज दुपारी सव्वा तीन वाजताच्या सुमारास विशेष विमानाने त्यांचे विमानतळावर आगमन झाले. जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात मुख्यमंत्री शिंदेंचा सत्कार शिंदे गट आणि भाजप नेत्यांकडून करण्याचा नियोजन करण्यात आले होते.

दरम्यान, आंदोलनाचा इशारा देण्यात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना नोटीस देण्यात आली होती. त्यांना आंदोलना आधीच चौकात असलेल्या राष्ट्रवादी कार्यालयाच्या बाहेर महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी महिला महानगराध्यक्ष मंगला पाटील, रिंकू चौधरी, सुनील माळी यांच्यासह आठ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT