Gulabrao Patil : ''ज्या ताटात खाल्लं आहे त्याच ताटात घाण करायची आपली संस्कृती नाही. मात्र, आपण योग्य वेळी उत्तर देऊ'', असं म्हणत पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. जळगावमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्यव्य केलं.
गुलाबराव पाटील म्हणाले, ''शिवसेनेत फुट पडल्यानंतर शिंदे गट वेगळा झाला. तेव्हा 40 आमदार शिवसेनेतून (ठाकरे गट) वेगळे झाले. त्या 40 पैकी 33 वा आमदार म्हणून मी शिंदे गटात सहभागी झालो. त्यामुळे आपण भगोडे नाहीत त्यांना सांगितल्यानंतर बाहेर पडलो'', असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
''अजित पवारांनी त्यांची चूक सुधाली. त्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील त्यांची चूक सुधारली. मात्र उद्धव ठाकरे हे त्यांची चूक सुधारायला तयार नाहीत. उद्धव ठाकरेंना ग ची बाधा नडली आहे '', असा टोला गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना लागावला.
''शिवसेनेत फुट पडण्याआधी राज्याच्या राजकारणात नेमकं काय घडत होतं? याबाबतची कल्पना पक्ष नेतृत्वाला दिली होती. पण त्यांनी याची दखल घेतली नाही. जर त्यावेळी याची दखल घेतली असती ती तर आज वेगळी परिस्थिती असती '', असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
''ज्यावेळी अजित पवारांनी सकाळीच उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. पण ती चूक त्यांनी देखील दुरुस्त केली होती. दिल्लीत देखील अरविंद केजरीवालांचे (Arvind Kejriwal) आमदार फुटून गेले होते. पण त्यानंतर त्यांना पुन्हा पक्षाच्या बाजूने करण्यात त्यांनी यश मिळविले होते''.
''तसेच आम्ही ज्या वेळी बंड केले त्या वेळी देखील हे सर्व शक्य होते. पण उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची असं करण्याची मानसिकताच नव्हती. उद्धव ठाकरे यांना ग खूप नडतो'', असं म्हणत गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.