CM Eknath Shinde Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

`गेल्या तीन महिन्यात आम्ही चांगलेच पर्यटन केले आहे`

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाशिकमध्ये मिश्किल टिप्पणी केली.

Sampat Devgire

नाशिक : छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांनी स्वराज्य स्थापन करताना गड (Castles & Forts) व किल्ल्यांची ऐतिहासिक संपत्ती (Heritage of Nation) देशाला दिली आहे. मात्र काळाच्या ओघात गडकिल्ल्यांची होणारी पडझड थांबविण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने दुर्ग प्राधिकरण (Forts Authority) स्थापन करण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली. (CM Eknath Shinde annonce to form Forts authority in the state)

कालिदास कलामंदिरामध्ये नाशिकरत्न पुरस्काराच्या वितरण समारंभानिमित्ताने बोलताना त्यांनी घोषणा केली. ते म्हणाले, थांबविण्याचे कर्तव्य राज्य सरकार पार पाडेल. छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली संपत्ती जपली जाईल. पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांनी मागील तीन महिन्यांत राज्य सरकारने घेतलेल्या महत्त्वाच्या ७२ निर्णयांचा उल्लेख करताना शेतकऱ्याला केंद्रीत मानून सरकार करत असल्याचे सांगितले. यंदा राज्यात प्रमाणापेक्षा अधिक पाऊस झाल्याने शेतीचे नुकसान झाले. मात्र सरकारने वेळ न दवडता तातडीने मदत जाहीर केली. भू-विकास बँकेचे साडेनऊशे कोटींचे कर्ज माफ करून शेतकऱ्यांना दिलासा दिला. तातडीने पंचनामे करून शेतीचे झालेले सर्व नुकसान सरकार देत आहे.

तीन महिन्यांचे अनुभवलेले पर्यटन

संभाजीराजे छत्रपती यांनी नाशिकमध्ये सर्वाधिक गड व किल्ले असून, त्याचे संवर्धन आवश्यक असल्याचे सांगताना यातून पर्यटनाला चालना मिळेल, असे वक्तव्य केले होते. त्याचा धागा पकडत मुख्यमंत्री शिंदे यांनी मागील तीन महिन्यांत आम्ही चांगले पर्यटन केल्याची मिश्किल टिप्पणी करत विकासाच्या माध्यमातून नाशिक दिसेल. पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा पाठपुरावा, आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महापालिका व जिल्हा विकास आराखड्याला प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले.

या वेळी व्यासपीठावर पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार सीमा हिरे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे पोलिस उपमहानिरीक्षक बी. जी. शेखर, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे, महापालिका आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, माजी नगरसेवक सलीम शेख आदी उपस्थित होते. सपकाळ नॉलेज हबचे संचालक रवींद्र सपकाळ यांनी प्रास्ताविक केले. नाशिक न्यूजचे मुख्य संपादक लक्ष्मण घाटोळ-पाटील यांनी स्वागत केले. दीपाली घाटोळ-पाटील यांनी आभार मानले.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT