Adv. Chimanrao Dange
Adv. Chimanrao Dange Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dhule News: मेंढपाळांच्या प्रश्नांवर लढा उभारण्यावर भर देऊ!

Sampat Devgire

धुळे : समाजाच्या (Shepherd) नेत्यांनी दिशाभूल करून स्वतःचे स्वार्थ साधून समाजाला वाऱ्यावर सोडले. मात्र, समाजशक्तीच्या (Power of community) जोरावर समाजाचे प्रश्न सोडवू. अनुसूचित जमातीच्या (एसटी) सवलती लागू करण्यासह मेंढपाळांच्या प्रश्नांवर लढण्यासाठी भर देऊ असा निर्धार धनगर समाज महासंघाचे (Shepherd federation) प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. चिमणराव डांगे (Adv. Chimanrao Dange) यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. (Shepherd community faces many issues in maharashtra)

धनगर महासंघाच्या मेळाव्यासाठी धुळ्यात आलेल्या ॲड. डांगे यांनी साक्रीरोडवरील पत्रकार भवनात पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, की दीड वर्षापूर्वी धुळ्यातच महासंघाच्या प्रदेशाध्यक्षपदी माझी निवड झाली. लॉकडाउनमुळे कामांवर मर्यादा आल्या. आता मात्र राज्यभर संघटन बांधणीसह समाजाच्या प्रश्नांसाठी लढण्याचे काम धुळ्यातूनच सुरु होत आहे. पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळाव्यात संघटनात्मक भूमिकेला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्यामुळे अधिक जोमाने काम करु.

धनगर समाजाला अनुसूचित जमाती संवर्गाच्या सवलती लागू करून त्यांचा लाभ मिळवून देणे, मेंढपाळांना मेंढ्या चारण्यासाठी गायरान जमिनी आणि वनक्षेत्रात कुरण उपलब्ध करून देणे यासह इतर महत्त्वाच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करून काम करणार आहोत. गेल्या पाच-सहा वर्षांत धनगर समाजाची फार दुर्दशा झाली आहे. या दुर्दशेतून बाहेर काढून समाजाला घटनात्मक हक्क मिळवून देण्यासाठी महासंघ कटिबद्ध असल्याचे ॲड. डांगे म्हणाले.

दरम्यान, दुपारी चारला शहरातील संतोषी माता चौकाजवळील सैनिक लॉन्स येथे महासंघाचा मेळावा झाला. अ‍ॅड. डांगे यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्‌घाटन झाले. महासंघाचे प्रदेश सचिव सुनील वाघ, सरसेनापती बबनराव रानगे, अंकुश निर्मळ, महिला प्रदेशाध्यक्षा डॉ. अलका गोडे, पंचायत समिती सभापती प्रा. विजय पाटील, भगवान गर्दे, गणेश गर्दे, जिल्हाध्यक्ष अशोक मुजगे, सरचिटणीस गोरख पाटील, दादा बागले, मनोज गर्दे, राजेंद्र गर्दे, अमोल मासुळे, चुडामण पाटील, लखन गोराड आदी उपस्थित होते.

--

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT