MLA Kunal patil with congress leaders
MLA Kunal patil with congress leaders Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Kunal Patil: आम्ही काँग्रेस सोडून जाणार नाही!

Sampat Devgire

धुळे : तीन पिढ्यांपासून आम्ही काँग्रेस (Congress) पक्षाची निष्ठेने (Loyality) सेवा करत आहोत. आमच्या रक्तातच काँग्रेस आहे. त्यामुळे कितीही त्रास आणि विरोध सहन करावा लागला तरी आम्ही काँग्रेस सोडून जाणार नाही अशी स्पष्ट भूमिका आमदार कुणाल पाटील (MLA Kunal Patil) यांनी मांडली. (MLA Kunal patil let face any trouble & Oppose will not leave congress paty)

धाडरे येथे पुलाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. पुलासाठी चार कोटी ७९ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. या पुलामुळे आर्वी, शिरुड, धाडरा, धाडरी, कुळथे परिसरातील गावांची सोय होणार आहे.

आमदार श्री. पाटील यांच्या प्रयत्नातून धाडरे येथे बोरी नदीवर पुलाचे काम मंजूर झाले. ११ सप्टेंबरला आमदार श्री. पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन झाले.

आमदार श्री. पाटील म्हणाले, सरकार बदलल्याने धुळे तालुक्यातील अनेक कामे शिंदे सरकारने स्थगित केली. मात्र, तालुक्याच्या विकासासाठी संघर्ष करण्याची आपली तयारी आहे. माजी खासदार दिवंगत चुडामण पाटील, माजी मंत्री रोहिदास पाटील आणि मी अशा आमच्या तीन पिढ्या काँग्रेसशी एकनिष्ठ आहोत. कितीही त्रास, विरोध झाला तरी कधीही काँग्रेस सोडून जाणार नाही.

पदयात्रेने परिवर्तन

सामान्य जनता महागाई, दडपशाहीला कंटाळली आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्या पदयात्रेतून देशात परिवर्तन होत आहे असा विश्‍वासही आमदार श्री. पाटील यांनी व्यक्त केला. विनोद बच्छाव यांनीही याप्रसंगी मनोगत व्यक्त केले.

यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती भगवान गर्दे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती घुगरी, माजी सरपंच संतोष पाटील, सरपंच धनुबाई अहिरे, माजी सरपंच राजेंद्र पाटील, सूतगिरणीचे संचालक पंढरीनाथ पाटील, बापू खैरनार, पंचायत समिती सदस्य दिलीप देसले, आर्वीचे सरपंच नागेश देवरे, शशिकाका रवंदळे, अ‍ॅड. बी. डी. पाटील, निमगुळचे सरपंच पांडुरंग मोरे आदी उपस्थित होते.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT