नाशिक : (Nashik) जगात उसापासून (Sugarcane) हायड्रोजन निर्मितीचे प्रकल्प सुरू झाल्याचे ऐकत आहे. त्याची आम्ही माहिती घेत आहोत. जर हा प्रकल्प यशस्वी होत असेल तर तो भारतातही (India) राबविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले. (Sugar Industry facing various issues at present in Maharashtra)
कादवा सहकारी साखर कारखान्याच्या असावणी (डिस्टिलरी) इथेनॉल प्रकल्पाचा प्रारंभ शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते झाला. यावेळी श्री. पवार यांनी ‘कादवा’ सारखा छोटासा कारखाना मात्र श्रीराम शेटे यांच्या स्वच्छ पारदर्शी कारभाराने सुस्थितीत सुरू आहे. त्यांनी वेळीच निर्णय घेत इथेनॉल प्रकल्प अल्पावधीत सुरू करून आदर्शवत काम केल्याचे सांगितले.
श्री. पवार यांनी साखर कारखानदारीचा आढावा घेतला. ते म्हणाले, साखर उद्योग अनेक अडचणींचा सामना करत असताना ‘कादवा’ सारखा छोटासा कारखाना मात्र श्रीराम शेटे यांच्या स्वच्छ पारदर्शी कारभाराने सुस्थितीत सुरू आहे. त्यांनी वेळीच निर्णय घेत इथेनॉल प्रकल्प अल्पावधीत सुरू करून आदर्शवत काम केले आहे. सहकारी संस्था कशा चालवाव्यात, याचा आदर्श त्यांच्याकडून घ्यावा.
श्री. पवार पुढे म्हणाले, की साखर उद्योग नेहमीच अडचणीतून मार्गक्रमण करत आहे. देशात साखरेचे अतिरिक्त उत्पादन होत असल्याने साखरेला उठाव नाही, अशा स्थितीत कारखाने अडचणीत आले. जगात केवळ साखरनिर्मिती नाही, तर साखरेपासून विविध उपपदार्थ इथेनॉल बनवले जात आहेत. त्यासाठी मी प्रयत्न केले, त्यास केंद्र सरकारनेही मान्यता देत चालना दिली.
श्री. शेटे यांनी वेळीच इथेनॉल प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला. कमी वेळेत हा प्रकल्प सुरू केला असून, या प्रकल्पामुळे काही वर्षात शेतकऱ्यांना किमान शंभर रुपये तरी जादा भाव मिळेल. श्रीराम शेटे यांच्या कामकाजाचे कौतुक करताना त्यांनी महाराष्ट्रात कादवा असा एकमेव कारखाना आहे, की तेथे चेअरमन व संचालक यांच्यासाठी गाडी नाही, त्यावरूनच येथील कामकाज लक्षात येते. सहकार क्षेत्र टिकवायचे असेल, तर या कामकाजाचा आदर्श घेणे आवश्यक आहे.
ही प्रतिष्ठा काय कामाची
केंद्र सरकारवर टीका करताना माजी केंद्रीय मंत्री पवार यांनी जगात आपल्या देशाची प्रतिष्ठा आपल्या पंतप्रधानांनी वाढवली, असे सांगितले जाते, त्याचा आम्हाला अभिमान आहे.; परंतु बांगलादेशसारखा देश आमचे द्राक्ष घेणार नसला तर ती प्रतिष्ठा काय कामाची, असा सवाल उपस्थित करत केंद्राने शेतकऱ्यांसाठी धाडसी निर्णय घ्यावे.
यावेळी शेटे यांचे अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त लोकनेता गौरव विशेषांकाचे प्रकाशन पवार यांच्या हस्ते झाले. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ अध्यक्षस्थानी होते. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ प्रमुख पाहुणे होते. माजी खासदार देवीदास पिंगळे, आमदार माणिकराव कोकाटे, नितीन पवार, दिलीप बनकर, नरेंद्र दराडे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद पगार, गणपतराव पाटील, दत्तात्रय पाटील, सदाशिव शेळके, संजय पडोळ आदी उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.