Eknath Khadse & Girish Mahajan
Eknath Khadse & Girish Mahajan Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

भाजपशी गद्दारी केलेल्या खडसेंकडे आज काय राहिले?

Sampat Devgire

मुंबई : एकनाथ खडसे (Eknath Khades) यांनी भाजपशी (BJP) गद्दारी केली. पक्षाने एव्हढी पदे देऊनही गद्दारी केल्याने आज त्यांच्याकडे काय राहिले आहे, असा प्रश्न करून त्यांची अवस्था `पंगत बसली, बुंदी संपली`, `मंदीरात गेले प्रसाद संपला`, `बाहेर आले तर चप्पल चोरीला गेली` अशी झाली आहे, अशी टिका भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केली. (Girish Mahajan criticise Eknath Khadse for rebel with BJP)

एका वृत्तवाहिनीला त्यांनी मुलाखत दिली. यावेळी ते म्हणाले, माझा त्यांना प्रश्न आहे की, यापूर्वी तुम्ही अनेक खात्यांचे मंत्री होतात. तुम्हाला सात-आठ खाते मिळाले होते. तुम्हाला काय मिळाले? या प्रश्नाचे उत्तर द्या. भाजपमध्ये असताना एव्हढ्या मोठ्या मोठ्या खात्यांचे मंत्री होतात, आता तिकडे गेल्याने तुम्हाला काय मिळाले. आज तुमचं काय राहिले आहे. आज तुमचे काय असा कुत्सीत प्रश्न त्यांनी केला.

ते पुढे म्हणाले, आज त्यांच्याबद्दल सोशल मीडियात काय काय चर्चा सुरु आहे. बुंदी संपली, मंदिरात गेले प्रसाद संपला, बाहेर आले तर चपला हरवल्या. आज तुम्ही पक्षाशी गद्दारी केली आज तुमचं काय राहिलं हो? असेही ते म्हणाले. तुम्ही तत्वापासून बाजूला झाले. तुम्ही तीथे काय काय केले, आम्हाला माहिती आहे.

श्री महाजन म्हणाले, खडसे पक्षश्रेष्ठींना वाटेल तसे काय काय बोलले. टिका केली. एका पक्षामध्ये राहून पक्षाने तुम्हाला एव्हढं देऊन तुम्ही काय केलं. एव्हढी वर्षे विरोधी पक्षनेतेपद, मंत्रीपद देऊनही तुम्ही म्हणता मला काय मिळाले. माझ्यावर अन्याय झाला. तुमच्या घरामध्ये सगळ्यांना पदं मिळाली. काय नाही मिळाले त्यांच्या घरामध्ये. मुलाला आमदार केले. मुलीला जिल्हा पिरषदेचे सदस्य केले, सभापती केले. सुनेला दोन टर्म खासदार केले. पत्नी मंदाकिनी एक वर्षे सांगून पाच वर्षे दूध संघाच्या चेअरमन राहिल्या. मुलगी एक वर्ष सांगून पाच वर्षे जिल्हा बँकेची चेअरमन राहिली. श्री. खडसे सहा वेळा उमेदवार होते. परत सातव्या वेळी मुलीला तिकीट दिले. तुम्हाला अपेक्षा काय आहे की, जेव्हढी पदे आहेतती सर्व माझ्या घरातच द्यावे की काय?.

श्री महाजन म्हणाले, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले म्हणून टिका करण्यात आली. मात्र मी यापूर्वीही म्हटले होते की, अशोक चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री होते. पृथ्वीराज चव्हाण मंत्री होते. शिवाजीराव निलंगेकर पाटील, विलासराव देशमुख या मुख्यमंत्र्यांना सभागृहात मागे बसताना मी पाहिले आहे. अनेक उदाहरणं आहेत. जे या राज्याचे मुख्यमंत्री होते, ते मंत्री देखील राहिलेले आहेत. ते मागेही बसलेले आहेत. आमदार म्हणून देखील बसलेले आहेत. त्यात नवीन काय?

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT