धुळे : पंतप्रधान नरेंद्र मोदी, (Narendra modi) गृहमंत्री अमित शहा, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि किरीट सोमय्या भाजपच्या या नेत्यांपुढे शिवसेनेच्या (Shivsena) आंदोलकांची काय पात्रता आहे? त्यांनी लायकीप्रमाणे वागावे. शहरात शिवसेनेला काहीही किंमत नाही, या शब्दांत महापौर महापौर प्रदीप कर्पे (Pradeep Karpe) यांनी शिवसेनेविषयी आपला संताप व्यक्त केला.
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या विरोधात `ईडी`ने कारवाई केल्याची तीव्र प्रतिक्रीया धुळे शहरात उमटली. शिवसेनेने यासंदर्भात भाजप विरोधात आक्रमक आंदोलन केले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पोस्टरसमोर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी अंगविक्षेप करीत टरबूज फोडले. त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते, नेते चांगलेच संतापले.
महापौर कर्पे म्हणाले, की ईडीच्या कारवाईनंतर शिवसेनेच्या पायाखालची वाळू घसरली आहे. धुळे शहरात शिवसेनेला जनाधार नाही. याउलट भाजपचा व मनपाच्या माध्यमातून केल्या जात असलेल्या विकासकामांचा धुळेकर उदोउदो करत असतात. त्यामुळे शिवसेनेच्या आंदोलनाप्रति भूमिकेचा आम्ही निषेध करतो.
ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि किरीट सोमय्या भाजपच्या या नेत्यांपुढे शिवसेनेच्या आंदोलकांची काय पात्रता आहे? त्यांनी लायकीप्रमाणे वागावे. शहरात शिवसेनेला काहीही किंमत नाही.
यासंदर्भात भाजपच्या नेत्यांनी शिवसेनेचा निषेध केला. महापौर कर्पे, जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, उपमहापौर अनिल मागमोते, माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर, हिरामण गवळी, प्रतिभा चौधरी, योगिता बागूल, सुनील बैसाणे, किरण अहिरराव, वालीबेन मंडोरे, राजू पवार, रोहित चांदोडे, मायादेवी परदेशी, माजी महापौर चंद्रकांत सोनार , जयश्री अहिरराव, विजय पाच्छापूरकर, यशवंत येवलेकर, नागसेन बोरसे, प्रा. सागर चौधरी यांच्यासह ५० हून अधिक नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांना निवेदन दिले.
----
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.