Hemant Godse News : निफाड सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना दोन महिने वेतन मिळाले नाही. त्यासाठी आंदोलनाचा इशारा दिल्यावर खासदार गोडसे यांच्या संस्थेने पगार तर दिला. मात्र, कारखान्याच्या गेटला कुलूप लावले. त्यामुळे कर्मचारी संतापले आहेत. (Niphad Sugar factory workers on strike at factory gate)
खासदार हेमंत गोडसे (Hement Godse) यांच्या संस्थेकडून निफाड (Niphad) सहकारी साखर कारखाना चालविण्यात येत आहे. त्यातील कर्मचाऱ्यांनी सध्या जिल्हा बँकेविरोधात (Nashik) आंदोलन सुरू केले आहे. मात्र, याबाबत खासदार गोडसे कामगारांवरच चांगलेच संतापल्याचे चित्र आहे.
याबाबत खासदार गोडसे यांनी कारखान्याचे कामगार संस्थेला कारखाना चालविण्यासाठी सहकार्य करीत नाहीत, अशी नाराजी व्यक्त केली होती. याविषयी निफाड सहकारी साखर कारखाना कामगार संघटनेचे नेते बी. जी. पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
पाटील म्हणाले, कामगार तीस-चाळीस किलोमीटर अंतरावरून कामावर येतो. त्याच्या मागे कुटुंब आहे. दोन महिने त्याला पगार मिळाला नाही. ते वेतन मागितले तर आम्ही काय पाप केले?. त्यासाठी वारंवार प्रशासनाला विनंती केली. व्यवस्थापनेने तीन वेळा मुदत देऊनही त्या मुदतीत वेतन दिले नाही. गेल्या शनिवारी कर्मचाऱी खूपच हट्टाला पेटल्यावर वेतन मिळाले. मात्र, प्रशासनाने गेटला कुलूप लावले, असा मनमानी कारभार करता येतो का?, असा प्रश्न केला.
ते पुढे म्हणाले, कारखान्याची १०८ एकर जमीन ड्रायपोर्टसाठी हस्तांतरित झाली. त्याचे १०१ कोटी रुपये `जेएनपीटी`कडून जिल्हा बँकेला वर्ग झाले. यातील ८१ कोटी रुपये कर्मचाऱ्यांचे वेतन, पीएफ, ठेवी याचे आहेत. ते मिळावे यासाठी जिल्हा बँकेविरोधात कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे.
सर्व कर्मचारी कामावर यायला तयार आहेत. त्यासाठी ते रोज गेटवर येतात. मात्र, गेटला टाळे लावले आहे. आम्ही सर्व सहकार्य करण्यास तयार आहोत. शेवटी कारखाना चाचला तर त्यात सगळ्यांचे हित आहे. आम्ही ऊसवाढीसाठीदेखील साह्य करण्याचे आश्वासन दिले आहे, तरीही खासदार गोडसे यांना का राग आला? हे समजत नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.