Uddhav Thackeray
Uddhav Thackeray  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Uddhav Thackeray On Farmers: 26 वर्षांच्या तरुणाने जीवन का संपवलं? उद्धव ठाकरेंनी सांगिंतलं खान्देशातलं भयाण वास्तव

सरकारनामा ब्युरो

Uddhav Thackeray Criticized State Governemt: देशाला कापूस पुरवण्यात खान्देशाचं मोठं योगदान आहे. कपाशीला योग्य भाव मिळत नसल्याने याच खान्देशातील शेतकरी थेट आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलत आहेत, अशा शब्दांत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी खान्देशातील भयाण वास्तवाकडे लक्ष वेधलं. रविवारी (२३ एप्रिल) पाचोऱ्यात महाविकास आघाडीची सभा झाली. यावेळी त्यांनी राज्य सरकारने शेतकऱ्यांकडे कसं दुर्लक्ष केलंय याकडे लक्ष वेधलं. (Why did the 26-year-old end his life? Uddhav Thackeray told the terrible reality of Khandesh)

कपाशी म्हणजे कापसाला आपण पांढरं सोनं मानतो. खान्देशातील अनेक भागांमध्ये कापसाची शेती केली जाते.कापसाला योग्य भाव मिळत नसल्याने खान्देशात दोन शेतकऱ्यांनी स्वत:ला संपवलं.“जळगावात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. पहिल्या एक 62 वर्षाच्या शेतकऱ्याने आत्महत्या केली. (Jalgaon news)

दुसऱ्या घटनेत 26 वर्षाच्या राहुल राजेंद्र पाटील या तरुणाने आत्महत्या केली. याच कारण म्हणजे त्याने वडिलांकडून पाच एकर जमीन घेतली होती. पण कपाशीला योग्य भाव मिळाला नाही म्हणून त्याने स्वतः च आयुष्याचं संपवलं. वडिलांकडून पाच एकर शेती घेतली. पण पीक गेलं म्हणून वडिलांना तोंड काय दाखवू, वडिलांना पैसे कुठून देऊ? डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे. शेवटी २६ वर्षाच्या पोराने गळफास लावून घेतला”, अशीसं उद्धव ठाकरे म्हणाले. (Uddhav Thackeray News)

खान्देशातील जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यांमधील अनेक गावांमधील शेतकरी आज कपाशीला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी चिंतातूर आहेत. मोठ्या शेतजमिनी असलेल्या शेतकऱ्यांपेक्षा एक ते पाच एकर जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांची संख्याही हजारांमध्ये आहे. आधीच कमी जमीन असल्यामुळे जो शेतमाल आलाय त्याला योग्य भाव मिळवण्यासाठी त्यांची ससेहोलपट होत आहे. पण त्याची राज्य सरकारला जाणीव आहे की नाही? असा प्रश्नही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT