Rajabhau Waje, Murlidhar Mohol  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Rajabhau Waje Politics : खासदार वाजे नागरी उड्डाण विभागावर का संतापले?

Sampat Devgire

Rajabhau Waje News : नाशिकची विमानसेवा सातत्याने चर्चेत असते. लोकसभा निवडणुका संपल्यानंतर केंद्र शासनाकडून नाशिकच्या विमानसेवेचे पंख कातरण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप आहे.

लोकसभा निवडणूक संपताच नाशिकच्या विमानसेवेची काही उड्डाणे स्थगित करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यामुळे संतापलेले खासदार राजाभाऊ वाजे यांनी नागरी विमान उड्डाण विभागाच्या प्रमुखांची भेट घेतली. याबाबत त्यांनी संताप व्यक्त केला. नाशिकची उड्डाणे कोणत्याही परिस्थितीत कमी करू नये असा इशारा त्यांनी दिला.

नाशिकहून (Nashik) अहमदाबादसाठी दोन उड्डाणे होती. नाशिक-नागपूर आणि नाशिक-गोवा हे विमानसेवा देखील सुरू होती. इंडिगो कंपनीतर्फे ही सेवा देण्यात येत आहे. आता अचानक या कंपनीने काही राजकीय नेत्यांच्या दबावातून अहमदाबादचे विमान रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

नाशिक-गोवा विमानसेवा देखील अनिश्चित बनली आहे. यातील काही सेवा औरंगाबादला वळविण्यात आल्या आहेत. नाशिक- गोवा आणि नाशिक- नागपूर या सेवा आता आठवड्यातून तीन दिवस करण्यात आल्या आहेत. एकंदरीतच नाशिकच्या विमानसेवेचे पंख कापण्याचे काम केंद्रातील भाजप सरकारने सुरू केल्याचा आरोप होत आहे.

या संदर्भात खासदार राजाभाऊ वाजे यांनी नुकतीच दिल्लीत नागरी उड्डाण विभागाचे प्रमुख मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांची भेट घेतली. नाशिकचे विमानसेवा आणि उड्डाणे यात कपात करू नये. नाशिकहून अधिक शहरांना जोडणाऱ्या विमानसेवेची आवश्यकता आहे. त्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

नाशिकच्या औद्योगिक आणि पर्यटन विकासासाठी प्रदीर्घकाळ अभिमान सेवेसाठी पाठपुरावा करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षात या सेवेचा विस्तार झाला आहे. राजकीय दृष्ट्या हा एक संवेदनशील विषय मानला जातो.

नाशिकहून सुरू झालेली विमानसेवा सातत्याने सुरू झाल्यावर काही कालावधीतच बंद देखील होते. या अनिश्चिततेमुळे प्रवाशांचे गैरसोय होते. विमानसेवा अनिश्चित बनल्याचे चित्र आहे. यावर केंद्र शासनाने हस्तक्षेप करून ही सेवा सुरळीत करण्याची मागणी देखील खासदार वाजे यांनी केली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर लगेचच याबाबतची स्थिती बनल्याने खासदार वाजे यांना देखील काम करण्यासाठी हे एक आव्हान मानले जाते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT