Nitin Thackray Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

MVP election: संस्‍थेच्‍या लेखापरीक्षणाबाबत का बोलले जात नाही?

बागलाण तालुक्‍यात परिवर्तनच्या मविप्र निवडणूक प्रचारसभेत ॲड. नितीन ठाकरे यांनी विचारणा केली.

Sampat Devgire

नाशिक : शतकोत्तर वाटचाल करताना संस्‍थेचे (MVP) कामकाज पारदर्शी असल्‍याचा दावा सरचिटणीसांकडून (General Secretary) केला जात आहे. संस्‍थेच्‍या लेखापरीक्षणाबाबत (Auditor) का बोलले जात नाही. सभासदांपासून ऑडिट रिपोर्ट दडविला जातो आहे. जिल्ह्यात मराठा (Maratha) समाजाचे ऑडिटर असताना इतर व जिल्ह्याबाहेरील ऑडिटर नेमण्याचे काय कारण, याचे उत्तर द्यावे, असे आवाहन परिवर्तन पॅनलचे नेते ॲड. नितीन ठाकरे (Adv. Nitin Thakckray) यांनी केले. (MVP Election Adv. Nitin Thackray Questioned on internal Audit)

परिवर्तन पॅनलतर्फे आज बागलाण तालुक्यात कंधाणे, वीरगाव, करंजाड, द्याने, नामपूर, लखमापूर येथे प्रचारदौरा झाला, त्या वेळी झालेल्‍या सभेत ते बोलत होते. ॲड. ठाकरे म्‍हणाले, की संस्‍थेचे ऑडिटर म्‍हणून काम करणाऱ्या मराठा समाजाच्‍या अधिकृत ऑडिटरला अनेक महिने ऑडिट करण्यासंदर्भात पत्र दिले जात नव्‍हते. नगरच्‍या दुसऱ्या ऑडिटर संस्‍थेला काम दिले असताना, त्‍यांना काम जमले नाही. या सर्व प्रकाराबाबत बोलण्याचे टाळले जात आहे. स्वाभिमानी सभासद यंदा परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही, असा दावा त्यांनी केला.

बाळासाहेब क्षीरसागर म्‍हणाले, की परिवर्तनाची लाट आहे. विद्यमान सभापती केवळ संस्थेची गाडी, चालक वापरतात. पण आजपर्यंत एकही सभासदाला न्याय मिळवून दिलेला नाही. चिटणीसपदाचे उमेदवार दिलीप दळवी यांच्‍यासह डॉ. प्रसाद सोनवणे यांनी विजयाचा निर्धार व्यक्त केला. शिरीष राजे यांनीही मनोगत व्‍यक्‍त केले. कडू चव्हाण, बाळासाहेब बिरारी, महादू बिरारी, रमेश पवार, भिला देवरे, माधवराव दिघावकर, रामदास देवरे, केवळ शेवाळे, लक्ष्मण निकम, उद्धाव देवरे, नामदेव कापडणीस, गौरव कापडणीस, चिंधू कापडणीस, भीमराव कापडणीस, मधुकर कापडणीस, भीमराव सावंत, बाळासाहेब सावंत, पंडित भामरे, अनिल बच्छाव, अशोक पाटील, अशोक बच्छाव, केवळ दळवी आदी उपस्थित होते.

बागलाण तालुक्यातील सभासद नाशिकपासून दिल्लीपर्यंत मोठ्या पदांवर उद्योग, नोकरीत आहेत. सजगतेबाबत कसमादे पट्टा जागरूक आहे, असे आमदार माणिकराव कोकाटे म्हणाले.

छत्री भेट देऊन सत्‍कार

वीरगाव, करंजाड, द्याने ग्रामस्थांकडून मोठी छत्री देत सन्मान व स्वागत करण्यात आले. या वेळी बाबूराव कापडणीस यांनी पाठिंबा दर्शविला. विविध ठिकाणी सभासदांनी भेट घेत, परिवर्तन पॅनलसोबत असल्‍याचे सांगितले. ॲड. ठाकरे व अन्‍य पदाधिकार्यांनी 'भ्रष्ट राजवटीवर प्रहार' या विशेष पुस्‍तिकेचे प्रकाशन केले. या पुस्‍तिकेतून अनेक विषयांवर सखोल माहिती जारी केली आहे.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT