<div class="paragraphs"><p>Chandrakant Raghuvanshi</p></div>

Chandrakant Raghuvanshi

 

Sarkarnama

उत्तर महाराष्ट्र

सात वर्षानंतरही नंदूरबार शहरातील बोगद्याचे काम अपूर्ण कसे?

Sampat Devgire

नंदुरबार : पालिकेने निधी देऊनही रेल्वे बोगद्याचे काम रखडले आहे. इतर सर्व ठिकाणी रेल्वेचे कामे होत असताना, शहरातील बोगद्याचे सात वर्षांपासून काम अपूर्ण कसे, असा सवाल शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी (Chandrakant Raghuwanshi) यांनी केला.

नंदुरबार नगरपरिषदेतर्फे भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल प्रवेशद्वाराच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, की शहरातील नागरिकांची सोय व्हावी व वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी, यासाठी नळवा रस्त्यावर उड्डाणपूलासाठी नगरपरिषदेने रेल्वे प्रशासनाला ३ कोटी रुपयांच्या निधी दिला. काम पूर्ण करण्यासाठी रेल्वेची मंजुरीही मिळाली असताना, अद्यापपर्यंत बोगद्याचे काम पूर्ण झाले नसल्याचे दुर्दैव आहे.

धरणात पाण्याचा साठा कमी असल्यामुळे शहरात पाणीटंचाई जाणवू नये, म्हणून दोन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय पालिकेने घेतला. १ मार्चपासून पुन्हा पूर्वीप्रमाणेच १ दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येईल. ४५ मिनिटांवरून १ तास पाणीपुरवठा होत असल्याची माहिती माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली. विरोधकांकडून पाणीप्रश्नी समाज माध्यमांवर व्हिडिओ प्रसारित करून जनतेत संभ्रमावस्था निर्माण करून राजकारण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना लोकांची साथ मिळाली नसल्याचे रघुवंशी यांनी सांगितले.

यावेळी अखिल भारतीय गुर्जर महासभेचे अध्यक्ष दीपक पाटील, नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी, उपनगराध्यक्ष रवींद्र पवार, डॉ. हेगडेवार सेवा समितीचे अध्यक्ष कृष्णदास पाटील, व्हीएसजीजीएमचे अध्यक्ष मोहन पटेल, केदारेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील, हिरालाल पाटील, प्रभाकर चौधरी, गिरीविहार सोसायटीचे चेअरमन भरत शहा, सचिव अशोक सोमाणी, इंजिनिअर किरण तडवी, बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता वैशाली पाटील, बांधकाम सभापती प्रमोद शेवाळे, नगरसेवक कुणाल वसावे, परवेज खान, नगरसेविका ज्योती पाटील, मनीषा वळवी यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT