नाशिक : प्रत्येकाची श्रद्धा असते. त्यासाठी मंदीरे (Temples) आहेत. घर (Home) आहे. मात्र अमरावतीच्या (Amravati) आमदार, खासदाराला मुंबईत ते देखील एका पक्षाच्या नेत्याच्या घरासमोर हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) म्हणायची आहे. हा अट्टहास कशासाठी?. हे थोडे न समजणारे आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवनीत राणा (Navneet Rana) व त्यांचे पती रवी राणा (Ravi Rana) यांच्या हेतूंवर शंका व्यक्त केली.
महाराष्ट्र पोलिस अकादमीच्या प्रशिक्षणार्थींच्या ११९ व्या तुकडीचे दीक्षांत संचलन सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पालकमंत्री छगन भुजबळ आदी मंत्री उपस्थित होते. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत श्री. पवार राणा प्रकरणावर बोलत होते.
ते म्हणाले, मुंबईमध्ये अमरावतीचे आमदार, खासदार यांनी हनुमान चालीसा म्हण्याचा निर्णय घेतला. लोकशाहीने प्रत्येकाला अधिकार दिला आहे. मात्र, त्यातून कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होता कामा नये. हे अतिशय प्राथमिक आहे. तरीही काही लोकांचा असा अट्टहास कशाला?. अनेकदा एखाद्या ठिकाणी जाण्यापूर्वी आम्हालाही सांगितले जाते की, तेथील वातावरण तंग आहे. त्यामुळे आम्ही पोलिसांची सूचना लक्षात घेऊन तिथे न जाण्याचा निर्णय घेत असतो. कालच्या प्रकरणात वेगळेच घडलेले दिसले, याचे आश्चर्य वाटते.
वादग्रस्त खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांचा उल्लेख टाळत ते पुढे म्हणाले, अमरावतीच्या आमदार, खासदारांनाही पोलिसांनी सांगितलं होतं. मात्र ते मुंबईत येऊन एका पक्षाच्या नेत्याच्या घरासमोर जाऊन हनुमान चालीसा पठण करायची म्हणत होते. प्रत्येकाची श्रद्धा असते. त्यासाठी मंदिरं आहेत. घरात म्हणावं त्यात कोणाचे दुमत असणार नाही. जे काही करायचे ते कायद्याच्या व नियमाच्या चौकटीत राहून कार्य करावे.
उपमुख्यमंत्री पवार यांनी पोलिसांकडून कोणावरही दबाव नाही किंवा पोलिसांवर देखील कोणाचाही दबाव नाही. कायदा व सुव्यवस्था राखने हे त्यांचे काम आहे. मुंबईत खार येथील फ्लॅट मध्ये ते दोघे थांबले होते. तिथे शिवसेना कार्यकर्ते जमले. जे व्हायला नको ते झालं. कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र झाल्या. त्यातून शिवसैनिक तिथे जमलेले होते. याबाबत जिथे वाद किंवा तणाव असेलेला जमव आहे. तिथे एक व्यक्ती गेली. तिथे ही घटना घडली. ती घडायला नको होती. याबाबत दोन्ही बाजूंनी तक्रार दाखल आहे. पोलिस तपास करतील. पोलिस व्यवस्थित काम करतील. कुणाची चूक, सिसीटिव्ह तपसले जाईल. दगड मारणे आणि गाडी अंगावर घालणे याबाबत देखील तपास होईल.
या प्रकरणाबाबत पोलिसांनी त्यांचे काम केले आहे, असे पवार म्हणाले, हे सर्व घडल्यावर देखील पोलिसांनी राणा दामपत्याला त्यांच्या भूमिकेबाबत समजावलं. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यामुळे थांबतो असे श्री. राणा म्हणाले.
कोणताही राजकीय पक्ष असुद्या राज्य कारभार करीत असताना सगळीकडे शांतता नांदायला हवी. विरोधकांना वाटतं की, पोलिस फक्त सत्ताधाऱ्याचं ऐकतात असा त्यांचा समज असतो. आम्ही विरोधात होतो तेव्हाही आम्हालाही असच वाटायचं. केंद्र असो वा राज्य सर्वांना सुरक्षा हवी. कोणावरही हल्ला नकोच. त्याच बरोबर कुणालाही उचकविण्याचा प्रयत्न व्हायलाच नको. मातोश्रीबाबत शिवसैनिकांच्या भावना तीव्र आहेत. तीच भावना प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या ज्येष्ठ नेत्यांबाबत असते. सगळे सांगत होते की, तिथं जाणे योग्य नाही. तरी हा अट्टाहास का? राजकीय हस्तक्षेपाला पोलिसांनी बळी पडू नये. सगळ्यांनी आपली जबाबदारी पार पाडवी. राज्य उत्तम पद्धतीने पुढे जावं.
...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.