Dy. CM Ajit Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Girna Water issue & Politics : अजित पवार गिरणा खोऱ्याला पुन्हा उपाशी ठेवणार का?

Will Ajit Pawar keep Girna basin starve for his own politics-गंभीर प्रश्नावर दादा भुसे, गुलाबराव पाटील, गिरीश महाजन, भारती पवार हे खानदेशचे मंत्री हे शांत कसे?

Sampat Devgire

Malegaon water Politics : गिरणा खोरे अतितुटीचे आणि अवर्षणग्रस्त आहे. असे असताना येथील हक्काचे व प्रस्तावित वांजूळपाणी- मांजरपाडा दोनचे पाणी बीडसाठी गोदावरी खोऱ्यात नेण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. त्यातून त्यांनी ‘कसमादे’च्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप संघर्ष समितीने केला आहे. (Wanjulpada water committee aggressive on Girna basin water)

यासंदर्भात खानदेशचे (Khandesh) मंत्री दादा भुसे, (Dada Bhuse) गुलाबराव पाटील, (Gulabrao Patil) गिरीश महाजन, (Girish Mahajan) भारती पवार (Bharti Pawar) हे शांत कसे? असा प्रश्‍न वांजुळ पाणी संघर्ष समितीने केला आहे.

याबाबत समितीचे निखिल पवार म्हणाले, आधीच अवर्षणग्रस्त असलेल्या गिरणा खोऱ्यातील मांजरपाडा प्रकल्पाच्या माध्यमातून आधीच गोदावरी खोऱ्यात पळविण्यात तत्कालीन मंत्र्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यातून गिरणा खोरे उपाशीच ठेवणार का? असा प्रश्न निर्माण होतो. तसे झाल्यास पुन्हा एकदा मांजरपाडा-२ जनआंदोलन उभे राहील, असा इशारा वांजुळ- पाणी संघर्ष समितीने दिला. त्यांनी उपमुख्यमंत्र्यांचा निषेध केला आहे.

आधी इथली तहान भागवा, मग काय न्यायचे ते पाणी तिकडे न्या, पण घरच्याला उपाशी ठेवून दारच्याचे पोट भरू नका, असे आवाहन समितीने केले आहे.

पवार आपल्या सहकाऱ्यांचे राजकीय भविष्य सुरक्षित करण्यासाठी कसमादेनाच्या हक्काचे नारपारचे पाणी गोदावरी खोऱ्यात नेण्याची तयारी करीत आहेत. त्यासाठी एक लाख कोटी खर्च आला तरी चालेल नारपारचे पाणी बीडला पोहोचवू, अशी घोषणा त्यांनी केली. या वेळी भुजबळ हेदेखील व्यासपीठावर होते.

भुजबळ यांनी मांजरपाडा, देवसाने प्रकल्प मार्गी लावण्यासाठी सर्व ताकद पणाला लावली. नारपारच्या खोऱ्यातले पाणी गोदावरी खोऱ्यात वळविले.

आता हीच रणनीती वापरून पुन्हा गिरणा खोऱ्यावर अन्याय करणार का? हे सुरू असताना खानदेशचे मंत्री दादा भुसे, गुलाबराव पाटील, गिरीश महाजन, भारती पवार हे शांत कसे? हा प्रश्‍न पडतो. या मंत्र्यांनी आपली शक्ती पणाला लावून वांजुळपाणी प्रश्‍न मार्गी लावावा, असे आवाहन वांजुळपाणी संघर्ष समितीचे प्रा. के. एन. आहिरे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विश्वासराव देवरे, निखिल पवार आदींनी केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT