BJP MLA Seema Hirey
BJP MLA Seema Hirey Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

भाजपच्या आमदार सीमा हिरे कन्येला नगरसेवक करू शकतील?

Sampat Devgire

नाशिक : कधी काँग्रेस, (Congress) कधी राष्ट्रवादी काँग्रेस, (NCP) तर कधी भाजप-शिवसेना, अशा सर्वच पक्षांना न्याय देणाऱ्या या प्रभागांमध्ये यंदा पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सीमा हिरे (BJP MLA Seema Hiray) यांना मुलगी रश्मी हिच्या सोबतच भाजपचे संपूर्ण पॅनल निवडून येईल का याची उत्सुकता लागली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीचा विचार करता महापालिकेच्या प्रभाग अकराची निवडणूक त्यांची कसोटी पाहणारा ठरेल, यात शंका नाही.

एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसने भगदाड पाडले. राष्ट्रवादी काँग्रेसचा जम बसत नाही, तोच भाजपने मुसंडी मारली. त्यानंतर शिवसेनेला येथे जन्म बसविता आला. मनसेलादेखील पाच वर्षे या प्रभागाने सांभाळले. त्यामुळे सर्व पक्षांना न्याय देणारा हा प्रभाव किंवा भाग आहे, असे म्हणता येईल. सन २०१७ च्या निवडणुकीत शिवसेनेचा एकमेव संपूर्ण पॅनल या भागातील नागरिकांनी निवडून दिला. त्याचे फलित म्हणून पाच वर्षे शिवसेनेकडे गटनेते पद कायम राहिले. यंदा मात्र प्रारूप प्रभागरचनेने या भागाचे सर्वच गणिते बिघडवून टाकले. तीन सदस्यांच्या प्रभागात एक एसी, एक एसटी व एक महिला राखीव, असे आरक्षण पडल्यास विद्यमान नगरसेवकांना अन्यथा शोधाशोध करावी लागेल. दोन आरक्षणे निश्चित असल्याने प्रस्थापित विस्थापित होण्याची दाट शक्यता दिसून येत आहे

हे आहेत इच्छुक

विलास शिंदे, संतोष गायकवाड, रश्मी हिरे, वर्षा भालेराव, नयन गांगुर्डे, कविता गायकवाड, राधा बेंडकोळी, उषा बेंडकोळी, नानासाहेब कदम, गौतम जाधव, भास्कर जाधव, शंकर पोटिदे, सागर कोथमिरे, राजू जाधव, डॉ. अमोल वाजे, प्रवीण पाटील, नारायण जाधव, दत्ता पाटील, महेंद्र शिंदे, अमित कोथमिरे, प्रवीण अहिरे, आशा भंदुरे, अर्चना कोथमिरे, रूपाली अहिरे, रोहिणी नायडू.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT