Chimanrao Patil & Kishor Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Jalgaon politics; मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाला न्याय मिळेल का?

मंत्रीमंडळ विस्तारात संधी मिळावी यासाठी किशोर पाटील, चिमणराव पाटील, लता सोनवणे यातील कोणाला संधी मिळणार

Sampat Devgire

जळगाव : (Jalgaon) राज्याच्या (Maharashtra) मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी दिल्लीवारी केली आहे. त्यामुळे लवकरच विस्तार होण्याचे संकेत आहेत. जळगाव जिल्ह्यातून शिंदे गटातील आमदार किशोर पाटील, (Kishor Patil) चिमणराव पाटील (Chimanrao Patil) व लता सोनवणे (Lata Sonawane) यापैकी कुणाला संधी मिळणार, याकडे आता लक्ष लागून आहे. (Kishor patil, Chimanrao Patil & Lata Sonawane are expecting cabinet in upcoming expansition)

दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी मंत्री मंडळाच्या विस्तारावरच चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. भाजप आणि शिंदे गटातून मंत्रिमंडळात कुणाला संधी देण्यात येईल, याची यादीही तयार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

शिवसेना फुटीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जळगाव जिल्ह्यातून चांगली साथ मिळाली आहे. शिवसेनेचे चारही आमदार फुटले. शिवाय पाठिंबा देणारे आमदारही सोबत गेले. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात विधानसभेत शिवसेना शून्य झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार स्थापन झाल्यावर पहिल्या टप्प्यात तत्कालीन मंत्री गुलाबराव पाटील यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाले.

गुलाबराव पाटील यांच्याकडे जुनेच खाते राहिले. विस्तारात आणखी एकाला संधी मिळणार असल्याचे सांगण्यात आले. आता मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे. त्यामुळे शिंदे गटाचे पारोळ्याचे आमदार चिमणराव पाटील, पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील, की चोपड्याच्या आमदार लता सोनवणे यांच्यापैकी कुणाला संधी मिळणार, याची चर्चा सुरू झाली आहे.

पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत निकटचे आहेत. अनेकवेळा त्यांच्या आमंत्रणावरून मुख्यमंत्री शिंदे पाचोरा येथेही आले आहेत. मुख्यमंत्री बनण्यासाठी पाचोऱ्यातील एका देवस्थानाचा कौलही घेण्यासाठी श्री. शिंदे अचानक आले होते. आमदार किशोर पाटील यांचे त्यांना सहकार्य होते. त्यामुळे त्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. पारोळा येथील आमदार चिमणराव पाटील शिवसेनेचे सर्वांत ज्येष्ठ आमदार आहेत. शिवसेनेत असताना मंत्रिपद मिळण्याची त्यांना अपेक्षा होती. मात्र त्यांना मिळाले नाही.

शिवसेना फुटल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत पहिल्या टप्प्यात चिमणराव पाटील होते. त्यामुळे आता त्यांना संधी मिळण्याची अपेक्षा असून, त्यांचे नावही चर्चेत आहे. त्यामुळे शिंदे गटाचे जिल्ह्यातील दुसरे मंत्री कोण होणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT