MLA Lata Sonawane|
MLA Lata Sonawane| 
उत्तर महाराष्ट्र

Lata Sonawane| शिंदे गटाच्या आमदाराची आमदारकी रद्द होणार? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

सरकारनामा ब्युरो

जळगाव : जळगावातील चोपडा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार लता सोनवणे यांची आमदारकी धोक्यात आली आहे. नंदुरबार जात पडताळणी समितीने त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवले होते. या प्रकरणी शिंदे गटाच्या आमदार लता सोनवणे ( Lata Sonawane ) यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पण उच्च न्यायालयाने त्यांची ही याचिका फेटाळून लावली. त्यानंतर आमदार सोनवणेंनी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) धाव घेतली. मात्र न्यायालयानेही उच्च न्यायालयाचा निकाल कामय ठेवला. न्यायालयानेही लता सोनवणे यांचे जातप्रमाणपत्रच अवैध ठरवल्याने त्यांची आमदारकीही धोक्यात आली आली आहे.

लता सोनवणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार जगदीशचंद्र रमेश वळवी यांचा पराभव केला. निवडणुकीनंतर जगदीशचंद वळवी यांनी सोनवणेंच्या विरोधात जातीचा दाखला अवैध असल्याची तक्रार औरंगाबाद खंडपीठात दाखल केली. खंडपीठाने नंदुरबार जात पडताळणी समितीला चौकशीचे आदेश दिले होते.

जात पडताळणी समितीनेही आमदार सोनवणेंचे अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र अवैध ठरवले. त्यानंतर सोनवणे यांनीदेखील समितीच्या निर्णयाविरोधात औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. मात्र खंडपीठाने जात पडताळणी समितीचा निर्णय कायम ठेवला. त्यानंतर लता सोनवणेंनी थेट सर्वोच्च न्यायालयातही या निर्णयाला आव्हान दिलं. मात्र सर्वोच्च न्यायालयानेही खंडपीठानेही आमदार सोनवणे यांचं जात प्रमाणपत्र रद्द ठरवलं. त्यामुळे जर सोनावणेंची आमदारकी गेली तर शिंदे गटात ४० पैकी ३९ आमदार शिल्लक राहतील.

मात्र या सर्व बाबींवर लता सोनवणेंचे पती माजी आमदार चंद्रकांत सोनावणे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. '' लता सोनवणेंची आमदारकी कायम आहे. न्यायालयाने आमची याचिका फेटाळून लावली आहे. पण आम्ही ती पुन्हा री ओपन करणार आहोत. न्यायदेवता आम्हाला नक्कीच न्याय देईल.'' असा विश्वास चंद्रकांत सोनावणेंनी व्यक्त केला आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार, आमदारकी रद्द करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया असते, असेही सोनवणे यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT