Sanjay Raut, Shivsena Leader Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

संजय राऊत भुजबळांना सल्ला देणार की सुहास कांदेंची बाजू घेणार?

खासदार संजय राऊत उद्यापासून तीन दिवस नाशिकच्या दौऱ्यावर आहेत.

Sampat Devgire

नाशिक : शिवसेना नेते, खासदार संजय राऊत ( Shivsena leader Sanjay Raut) उद्या (ता. २२) पासून तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. (Nashik tour for three Days) त्यांचा हा दौरा प्रामुख्याने महापालिका निवडणुकीच्या तयारीचा भाग आहे. (NMC Election prepration) मात्र ते नांदगावला देखील मेळावा घेणार आहेत. त्यामुळे या मेळाव्यात ते काय बोलणार याची उत्सुकता आहे. पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि आमदार सुहास कांदे (Suhas Kande) वादाच्या पार्श्वभूमीवर ते भुजबळांना सल्ला देणार की, सआमदार कांदे यांची बाजू घेणार? याची उत्सुकता आहे.

शिवसेना नेते राऊत उद्या (ता.२२) नाशिकला येत आहेत. यावेळी त्यांच्या उपस्थितीत घोटी (ता. इगतपूरी) येथे पक्षाच्या कार्यालयाचे उदघाटन होईल. त्यानंतर शनिवारी शहरात पक्षाच्या नगरसेवकांच्या प्रभागातील विविध विकासकामांचे लोकार्पण आणि कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात शिवसेना कार्यकर्ते, पादधिकाऱ्यांचा मेळावा होईल. रविवारी खासदार राऊत यांचा जिल्ह्यातील चांदवड, दिंडोरीसह प्रामुख्याने मनमाड येथे ऑक्सीजन प्लॅंटचे लोकार्पण आणि नांदगाव येथे मेळावा होणार आहे.

खासदार राऊत यांचा नांदगाव तालुक्यातील मेळावा महत्त्वाचा आहे. स्थानिक आमदार सुहास कांदे यांच्याकडे त्याचे सर्व नियोजन असेल. नांदगाव हा पालकमंत्री छगन भुजबळ यांचे चिरंजीव माजी आमदार पंकज भुजबळ यांनी प्रतिनिधीत्व केलेला व सध्या शिवसेनेचे आमदार कांदे प्रतिनिधीत्व करीत असलेला मतदारसंघ आहे. नुकतेच आमदार कांदे यांनी जिल्हा नियोजन मंडळाच्या विकासकामांच्या निधीत नांदागाव मतदारसंघावर पालकमंत्र्यांकडून झालेला अन्याय, तसेच आपल्या मतदारसंघाच्या प्रपश्नांबाबत तक्रारी केल्या होत्या. याबाबत त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली होती. पालकमंत्री भुजबळ तसेच जिल्हाधिकारी व अन्य संबंधींताविरोधात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात दावा दाखल केला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पालकमंत्री भुजबळ यांनी शिवसेना नेत्यांशी संपर्क केला होता. त्यामुळे नाशिकच्या दौऱ्यावर येत असलेले खासदार राऊत त्यात नक्कीच ही भूमिका बजावण्याची शक्यता आहे.

नांदगाव दौऱ्यात कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे. त्यामुळे कार्यकर्ते व पदाधिकारी नक्कीच हा विषय उपस्थित करू शकतील. त्यात खासदार राऊत मोठ्या भावाची भूमिका घेऊन हा वाद कसा सोडवतात. ते पाकलमंत्र्यांची बाजू घेता की आमदार कांदे यांना कानमंत्र देऊन जातात, याची उत्सुकता आहे.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT