Guardian Minister Chhagan Bhujbal In Yeola meeting
Guardian Minister Chhagan Bhujbal In Yeola meeting Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

शेतीला दिवसा, अखंडीत विज मिळावी यासाठी माझा प्रयत्न!

Sampat Devgire

येवला : शेतकऱ्यांच्या (Farmers) विजेच्या समस्यांचे निराकरण करण्यात येईल. त्यांना दिवसा व अखंडीत वीज पुरवठा करण्यासाठी मी पाठपुरावा करेन. विजबिले भरल्याने येणारा निधी गावातील विजेची कामे मार्गी लावण्यासाठी परत मिळणार आहे. त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल असे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सांगितले.

श्री. भुजबळ यांच्या हस्ते आज सत्‍यगावला ग्रामपंचायत कार्यालय, आदिवासी वस्तीमधील सभामंडप व अंगणवाडी इमारतीचे उद्घाटन तर साताळी येथे साईबाबा मंदिर सभामंडपाचे उद्घाटन करण्यात करण्यात आले, त्याप्रसंगी ते बोलत होते. येथील शासकीय विश्रामगृहात निफाड व येवला तालुक्यातील कोरोना सद्यस्थिती आणि उपाययोजनांबाबत पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी आढावा बैठक घेतली.

प्रांताधिकारी सोपान कासार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सागर चौधरी,उपअभियंता उमेश पाटील, तहसीलदार शरद घोरपडे,प्रमोद हिले, मुख्याधिकारी संगीता नांदूरकर,वैद्यकीय अधिकारी डॉ.शैलजा कृपास्वामी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षल नेहेते, डॉ. शरद कातकाडे, गटविकास अधिकारी अन्सार शेख, संदीप कराड, पोलिस निरीक्षक भगवान मथुरे आदी उपस्थित होते. तिसऱ्या लाटेत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अधिक जलद गतीने वाढत आहे. या लाटेतील आजाराची लक्षणे सौम्य असल्याने ज्यांनी लसीकरण केले आहे, त्यांना याचा धोका कमी जाणवतो. त्यामुळे नागरिकांना लसीकरणाचा दुसरा डोस देण्यासाठी नियोजन करून १०० टक्के लसीकरणासाठी प्रयत्न करावे भुजबळ यांनी सांगितले.

यावेळी आमदार नरेंद्र दराडे, जिल्हा परिषद सभापती संजय बनकर, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, वसंत पवार, गटनेते मोहन शेलार, अनिता काळे, बाळासाहेब गुंड, विश्वासराव आहेर, साहेबराव आहेर, विनोद जोशी, भाऊसाहेब बोचरे, प्रकाश वाघ, ज्ञानेश्वर शेवाळे, अर्जुन कोकाटे, सरपंच नानासाहेब सांगळे, साहेबराव सांगळे, उपसरपंच सुनील सांगळे, सुधीर सांगळे, वाल्मिक सांगळे, साताळीचे सरपंच सुनंदा काळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT