इचलकरंजी : संघटित झाल्याशिवाय न्याय मिळत नाही तुम्ही संघटित होऊन तुमची शक्ति दाखवून दिली आहे त्यामुळे विणकरांचे प्रश्न नक्की मार्गी लागणार असा विश्वास राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी व्यक्त केला आहे. (Chhagan Bhujbal said, Ypu shall organise to resolve our issues)
इचलकरंजी येथे राष्ट्रीय विणकर सेवा संघातर्फे घेण्यात आलेल्या विणकर महाधिवेशनला मंत्री भुजबळ यांनी संबोधित केले. त्यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले की राज्यातले महाविकास आघाडी सरकार तुमच्या सोबत आहे. विणकर समाजाच्या प्रश्नाबद्दल राज्यातले सरकार सकारात्मक आहे. विणकरांच्या प्रश्नांसाठी लवकरच शासनाकडे संबंधित मंत्र्यांसोबत संयुक्त बैठक घेऊन विणकारांचे प्रश्न मार्गी लावणार आहे. राज्य शासन आपल्यासोबत आहे.
भुजबळ म्हणाले की आरक्षण संपवण्याचा घाट देशात घातला जात आहे. त्यामुळे सर्व मागसवर्गीयांनी एक होण्याची ही वेळ आहे.सर्वांनी एकत्र येत एक लढा उभारण्याची गरज आहे, आम्ही ओबीसींसाठी लढा उभा केला आहे तुम्ही आमच्या ओबीसी लढ्यात सामील व्हा एकजूट झाली तरच याबाबतीतला न्याय आपल्याला मिळेल. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा निर्माण झालेल्या प्रश्नाचा इतिहास वाचून दाखवला. यावेळी ते म्हणाले की मागच्या सरकारच्या वेळेस ओबीसींच्या राजकीय आरक्षणचा हा प्रश्न तयार झाला. मात्र मागच्या सरकारने हालचाली केल्या नाही.
या महाधिवेशनाला मंत्री भुजबळ यांच्यासह माजी खासदार राजू शेट्टी, जगद्गुरू बसवराज पट्टादार्य स्वामी, आमदार प्रकाश आवाडे, कालाप्पा आवाडे, प्रकाश शेंडगे, राजीव आवळे, समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापू भुजबळ, मदन कारंडे, विजतज्ञ प्रताप होगाडे, समता परिषदेचे दादासाहेब चोपडे, प्रकाश सातपुते, विठ्ठल चोपडे, रमेश भाकरे, डॉ अनिल कांबळे, सुनील मेटे, प्रेमलाताई साळी, नागेश क्यादगी, दत्ता मांजरे, निलेश मुसळे आणि राष्ट्रीय विणकर सेवा संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
---
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.